नोएडा, उत्तर प्रदेश : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी हा अतिशय खास दिवस या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिची रक्षा करण्याचं वचन देतो. आता पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदरही रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तानी सीमा हैदरने (Pakistani Seema Haider) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील दिग्गन नेत्यांना राखी पाठवली आहे.
सीमा हैदरने मोदी, शाहांसह दिग्गजांना पाठवली राखी
सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना पोस्टाने राखी पाठवली आहे. यासोबत सीमाने सरसंघचालक मोहन भागवत यांनाही राखी पाठवली आहे. सीमा हैदरने या दिग्गज नेत्यांना राखी पाठवून आनंद व्यक्त केला आहे. तिनं आशा व्यक्त केली आहे की, तिची राखी या दिग्गजांपर्यंत पोहोचेल.
बहिणीच्या म्हणून आनंद व्यक्त केला
सीमा हैदरने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे सीमा हैदरने या दिग्गजांना राखी पाठवून बहिणीच्या नात्याने आनंद व्यक्त केला आहे. सीमा हैदरने इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी उपवास आणि पूजा-अर्चा देखील केली.
पाहा व्हिडीओ : राखी पाठवताना नेमकी काय होती सीमा हैदरची भावना
पाकिस्तानी सीमा हैदर चर्चेत
पाकिस्तानी सीमा हैदरने अवैध पद्धतीने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मे महिन्यापासून ती नोएडामध्ये तिचा प्रेमी सचिनसोबत राहत आहे. दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. त्यानंतर आता सीमा हैदर हिंदू धर्मीय महिलेप्रमाणे साडी, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू अशा वेशात दिसते. तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावाही केला आहे.
पबजीवरुन जडले प्रेम, मग थेट भारतात एन्ट्री
सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :