Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tilak Verma Tattoo : तिलक वर्माचा नवा 'अध्यात्मिक' टॅटू! पूर्ण करण्यासाठी लागले 7 दिवस; यामागचा अर्थ काय? जाणून घ्या...
तिलक वर्माच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने उजव्या हातावर टॅटू काढला आहे. (PC:alienstattoo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसखोल आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या तिलक वर्माला त्याच्या श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रतीक असणारा टॅटू काढायचा होता. (PC:alienstattoo)
तिलक वर्माच्या हातावरील हा टॅटू पूर्ण करण्यासाठी तब्बल सात दिवस लागले. (PC:alienstattoo)
व्यस्त असल्यामुळे तिलकला हा टॅटू पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागला. (PC:alienstattoo)
टॅटू डिझायनर समीर कुरेशी आणि सनी भानुशाली यांनी मिळून तिलक वर्माच्या आवडीनुसार हा खास टॅटू डिझाइन केला आहे. (PC:alienstattoo)
एलियन्स टॅटूचे मालक आणि क्रिएटर सनी भानुशाली यांनी तिलक वर्माचा हा नवीन टॅटू काढला आहे. (PC:alienstattoo)
या टॅटूमध्ये भगवान शंकर आणि श्री गणेश यांची सुंदर कलाकृती साकारण्यात आली आहे. (PC:alienstattoo)
त्याच्या बायसेपवरील भगवान शंकराचा टॅटू भक्ती, अध्यात्म आणि वैयक्तिक परिवर्तनाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती याचं प्रतिक आहे. यासोबतच हा टॅटू यातून बुद्धी, अध्यात्मिक, प्रबोधन, विश्वाची निर्मिती आणि विनाश यांच्यातील समतोल यासारख्या पैलूंचे प्रतिनिधित्व करतो. (PC:alienstattoo)
तर हातावरील श्री गणेशाच्या टॅटूमधून अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे अशी यामागची आशा आहे. (PC:alienstattoo)
या सोबतच त्याने छातीवर 'ॐ नमः शिवाय' टॅटू काढला आहे.(PC:alienstattoo)
उजव्या हाताच्या आतील बाजूस त्याने जास्वंदच्या फुलांचा टॅटू काढला आहे. यासोबतच 'Unwavering Self Trust' म्हणजेच अतूट आत्मविश्वास असं लिहिलं आहे. (PC:alienstattoo)
तिलकच्या पायाच्या पोटरीवर त्याचा लाडका कुत्रा 'ट्रिगर' याचा प्रोट्रेट टॅटूही आहे. (PC:alienstattoo)