मुंबई : आजकाल शासकीय कार्यालयापासून ते कोणत्याही खासगी कामासाठी आधार कार्ड (Aadhaar card) हे मागितले जाते. आधार कार्डची प्रत दिल्याशिवाय कोणतेही शासकीय किंवा खासगी काम होतच नाही. एखाद्या हॉटेलमध्ये राहायचे असले तर हॉटेलचा मालक तुम्हाला आधार कार्डची प्रत मागतो. आपण दिलेल्या याच आधार कार्डच्या मदतीने आपलीच अनेकवेळा फसवणूक होऊ शकते. आर्थिक पातळीवरही मोठा फटका बसू शकतो. अशीच अडचण येऊ नये, यासाठी मास्क्ड आधार कार्ड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) वापरल्यास समोरच्या व्यक्तीला तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यामुळे मास्क आधार कार्ड म्हणजे काय? ते कसे डाऊनलोड करावे? हे जाणून घेऊ या...


मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? (What is Masked Aadhaar Card)


मास्क्ड आधार कार्ड हे सामन्या आधार कार्डप्रमाणेच असते. या आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येतो. या मास्क्ड आधार कार्डमध्ये पहिले आठ आकडे लपवण्यात आलेले असतात.  म्हणजेच मास्क्ड आधार कार्डवर तुमच्या आधार नंबरमधील सुरुवातीचे आठ अंक दिसत नाहीत. समोरच्या व्यक्तीला मास्क्ड आधार कार्डवर शेवटचे फक्त चार अंकच दिसतील.  तुमचा आधार नंबर लपलेला असल्यामुळे तुमची इतर माहिती आपोआपच सुरक्षित होते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा हॉटेलवर मास्क्ड आधार कार्ड दिले तरीही त्याचा दुरुपयोग करता येत नाही. मास्क्ड आधार कार्ड हे तुमच्या सामान्य आधार कार्डचेच एक व्हर्जन असते. प्रवासादरम्यान तुम्ही या आधार कार्डचा वापर करू शकता. हॉटेल बुक करण्यासाठीही या आधार कार्डचा वापर करता येतो. विमानतळावरही या आधार कार्डचा वापर करता येतो. 


मास्क्ड आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे? (who to download Masked Aadhaar Card)


>>>> मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वांत अगोदर UIDAI च्या https:uidai.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 
त्यानंतर माय आधार या ऑप्शनवर क्लिक करावे. 


>>>> त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकून कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.


>>>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी जाईल. 


>>>> हा ओटीपी UIDAI च्या संकेतस्थलावर टाकून डाऊनलोड हा ऑप्शन निवडावा. 
 
>>>> त्यानंतर चेकबॉक्समधील डाऊनलोड मास्क्ड आधार या ऑप्शनवर क्लिक करावे. 


>>>> मास्क्ड आधार या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट या पर्यायाला सिलेक्ट करावे. 


>>>> त्यांतर तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड होईल. तुमचे मास्क्ड आधार हे पासवर्ड सिक्योर असेल. पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमच्या  इंग्रजीतील नावाचे चार अक्षरं तसेच जन्मतारखेचा महिना आणि वर्ष टाकावे लागेल. 


हेही वाचा :


Aadhaar Free Update: विसरला असाल, तर वेळेत करुन घ्या आधारबाबतचं 'हे' काम; फक्त 6 दिवस बाकी, डेडलाईन संपल्यानंतर....