Chandra Grahan 2024 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. यापूर्वी चंद्रग्रहण 25 मार्चला लागलं होतं. तथापि, शेवटचं चंद्रग्रहण हे आंशिक असेल, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 45 मिनिटं चालणार आहे. ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे, हे अर्ध चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. तर ते युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या भागात दिसणार आहे.


चंद्रग्रहण काळात राहा सांभाळून


या ग्रहणादरम्यान चंद्राचा फक्त एक छोटासा भाग गडद सावलीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहावं. काही राशींना कौटुंबिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअर आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे मानसिक स्थितीत चलबिचल दिसेल, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न कारा.


चंद्रग्रहण वेळ - सकाळी 06:12 ते सकाळी 10:17 
चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी - 04 तास 04 मिनिटं


चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही 


ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. या आधारे 18 सप्टेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी साधारणपणे 17 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक कालावधी लागू होणार नाही. वर्षातील या दुसऱ्या चंद्रग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही.


हे युरोप, आफ्रिका आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये दृश्यमान असेल. भारतात 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6:06 वाजता चंद्र मावळेल, तर ग्रहण सकाळी 6:12 वाजता सुरू होईल. परिणामी, ग्रहण सुरू होईपर्यंत चंद्र आधीच मावळला असेल, ज्यामुळे तो भारतात अदृश्य होईल.


सुतक पाळलं जाणार नाही


18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सुतक पाळलं जाणार नाही, कारण हे चंद्रग्रहण दिवसा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, उघड्या डोळ्यांनी दिसणारं ग्रहण हाच सुतक काळ मानला जातो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य