Buldhana News : शेतकर्‍यांना (farmers) पीक विमा कंपनीच्या (Crop Insurance) कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. यात बुलढाण्याच्या (Buldhana News) सिंदखेडराजा तालुक्यातील विविध गांवामध्ये हा धक्कादायक प्रकार घडत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असताना नुकसानीच्या सर्वे करताही रक्कम मोजावी लगत असल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 


एका शेतकर्‍याला एका गटासाठी 200 ते 300 रुपयांची मागणी


सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार दाखल केल्या होत्या. यावर पिक विमा कंपनीतून कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले गेले. त्यानंतर शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना मात्र पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे. पीक विमा कर्मचार्‍यांकडून एका शेतकर्‍याला एका गटासाठी 200 ते 300 रुपयांची मागणी केली जात असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.


मनसे महिलांनी केली दारू गुंत्याची होळी 


यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथे वारंवार सूचना देऊनही, पोलिसांना न जुमानता वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानाला गावातील महिलांनी आग लावली. यावेळी अवैध दारू विक्री करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.  


मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी चौकीवर अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यानंतर या प्रकरणी मनसेच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्या असून तालुकाप्रमुख उज्ज्वला चंदनखेडे, यांच्या नेतृत्वात महिलांनी त्याठिकाणी धाड टाकली. अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले हा येथुन पळ काढला. तर यावेळी देशी दारूचे 52 बॉटल आणि विदेशी दारूच्या 6 बॉटल जप्त करीत महिलांनी दारूच्या दुकानाला आग लावली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: