Addiction of Reels : सध्या यंग जनरेशन संपूर्ण वेळ रील्स (Reels) पाहण्यात घालवतात. हे काही सेकंदाचे व्हिडीओ इतके मनोरंजन करणारे असतात की, संपूर्ण वेळ स्क्रोल करत राहतात. अगदी 10 वर्षांपासून 55 वर्षांच्या वयोगटापर्यंत सर्वच जण रील्स पाहतात. यामुळेच याच वयोगटातील लोक मानसिक आजाराला (Mental Illness) बळी पडत आहेत.


आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. हवी असणरी प्रत्येक माहिती ही इंटरनेटवर आजच्या घडीला उपलब्ध आहे. या कारणामुळेच आजची यंग जनरेशन तासनतास मोबाईल फोन पाहण्यात घालवतात. परिणामी आपला सगळा वेळ स्क्रोल करण्यात घालवतात. बस, ट्रेन, मेट्रो, घर, कुटुंब या प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या मोबाईल फोमध्ये बिझी राहतात. तासनतास मोबाईल पाहणे, त्यावर स्क्रोल करणे आणि इन्स्टाग्रामचे रील्स पाहाणे याची इतकी सवय लोकांना लागली आहे की, त्याचा सरळ परिणाम हा शरीरावर होतो. 


आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळेच ज्या लोकांना फोनची जास्त आवड आहे त्यांना झोप न लागणे, डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जर तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला रीलचे स्वप्ने पडत आहेत. ही रील पाहण्याची सवय केवळ तरुणांमध्येच आहे असे नाही, तर 10 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांमध्येही दिसून येते. त्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याचाही धोका वाढला आहे. 


रील्स पाहण्याचे नुकसान


प्राथमिक तपासणीत रुग्णांनी कबूल केले की ते सुमारे दीड वर्षांपासून रील्स पाहत आहेत. ज्यामध्ये ते सकाळी उठल्याबरोबर रील बघायला लागतो आणि रात्रीपर्यंत तो रील पाहत राहतो. तर काही लोकांनी हे कबूल केले की, त्यांना व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या रील्स बघायला आवडतात. रील्स दिसले नाहीत तर त्याला विचित्र वाटू लागते. जर तुम्हाला डोकेदुखी असेल आम्हाला दुसरे कोणतेही काम करावेसे वाटत नाही असेही त्यांनी कबूल केले. अनेक रुग्णांची कहाणी ही अजूनच विचित्र आहे. रात्री उठल्याबरोबर ते बसून रील बघू लागतात. ते पुन्हा झोपतात.


रील्स पाहून शरीराचे होणारे नुकसान



  • डोळे आणि डोके दुखणे.

  • झोपेच्या वेळी डोळ्यात लाईट येतेय असे वाटणे.

  • खाणे-पिणे वेळेवर न करणे.


रील्स पाहण्याची हौस ही एखाद्या आजारापेक्षा कमी नाही, त्यामुळे त्यापासून संरक्षण करा



  • जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर दररोज कमी रिल्स पाहण्याचा प्रयत्न करा.

  • गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरा.

  • पुस्तके वाचायला सुरुवात करा.

  • मित्र आणि कुटुंबासह अधिक वेळ घालवा.


हेही वाचा


UPSC 2022 Results:  यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI