LinkedIn Job Post Verification : आजकाल फसवणूक करण्यासाठी नोकरीचे आमिष सहज दाखवण्यात येते. व्हॅाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन (LinkedIn) यांसारख्या सोशल मीडियावर नोकरीचे आमिष दाखवून व्यक्तिगत माहिती मिळवून फसवणुकीचे प्रकार सहज घडतात. त्यामुळे या नोकरीच्या फसवणुकीपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी लिंक्डइनने एक नवीन फीचर सुरु केले आहे. यामुळे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीसंबंधी योग्य ती माहिती उपलब्ध होऊ शकते. लिंक्डइनने जॉब पोस्टसाठी व्हेरिफिकेशनची सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता जे लोक लिंक्डइनवर नोकरीच्या शोधात आहेत ते आता कोणत्याही कंपनीबद्दल व्हेरिफाईड माहिती जाणून घेऊ शकतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील कमी होण्यास मदत होईल.
ज्या लोकांच्या प्रोफाईलवर See Verification डिटेल्स असा पर्याय येईल, ते लोक कंपनीकडून जे कोणी जॉब पोस्ट करत आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊ शकतात. तसेच या व्हेरिफिकेशनच्या सेवेमुळे तुम्हाला कंपनी आणि कंपनीशी संबंधित व्यक्तींचे वेरिफाइड ई-मेल किंवा त्यांच्या पेजविषयी माहिती मिळेल. नोकरी संबंधी पोस्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या फीचरमुळे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आणि जे नोकरी संबंधी पोस्ट करत आहेत त्यांना दोघांनाही फायदा होण्यास मदत होईल. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्या लोकांना नोकरीच्या संबंधी विश्वास निर्माण होईल आणि जे नोकरी संबंधी पोस्ट करत आहेत त्यांना कंपनीबाबतीत विश्वासार्हता निर्माण करण्यास मदत होईल.
नुकतेच सुरु झाले 'हे' फीचर
काही काळापूर्वी लिंक्डइनने 'About This Profile' हा पर्याय प्रोफाईल जोडण्यात आलेला होता. त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रोफाईलविषयी सहज माहिती उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच यामुळे फोन नंबर आणि ई-मेल व्हेरिफाईड आहेत की नाही हे देखील जाणून घेण्यास मदत होते. तसेच लिंक्डइनने 'Message Warning' अर्लट देखील सुरु केले आहे. त्यामुळे युजर्सना कोणत्याही प्रकारच्या खोट्या मेसेजपासून सुरक्षित राहता येईल. तसेच एखादी व्यक्ती इतर कोणत्या सोशल मीडियावर संवाद साधण्यास सांगत असेल तर लिंक्डइन युजर्सना अशा प्रकारच्या मेसेजना रिपोर्ट करता येते.
भारत लिंक्डइनच्या उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लिंक्डइन युजर्समध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून यामध्ये सुमारे 80 कोटी युजर्स आहेत. गेल्या तीन वर्षात भारतीय लिंक्डइन युजर्समध्ये च्या सदस्य संख्येमध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी युजर्सची वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर लिंक्डइनवर लोकांचा सहभाग आणि परस्पर संवादात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅपवर चुकीचा किंवा अपूर्ण मेसेज आता करता येणार एडिट!