वाशिम : सखल दिगंबर पंथियाच्या वतीने शुक्रवारी वाशिम  शहरात  भव्य मोर्चा  काढण्यात आला. जैन धर्मियांची काशी समजल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ  यांच्या मंदिरात असलेल्या दिगंबरी स्वरूपाच्या जैन धर्मियांच्या मूळ मूर्तीचे  स्वरूप बदलून, पूजन करून  गुजराती (श्वेतांबर) पंथियांकडून  ताबा करण्याचा  प्रयत्न  केला जातोय,  तर विरोध केल्यास मारहाण करून खोट्या  केसेस दाखल केल्या जात असल्याचा  आरोप दिगंबर पंथियांकडून केला गेला. प्रशासनाने मध्यस्ती करून दिगंबरी पंथियांना न्याय द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.


वाशिमच्या  बालाजी मंदिरापासून निघालेला  हा मोर्चा  वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजारोच्या संख्येने भाविकांनी ठिया मांडून  आपल्या मागण्या  मांडल्या. 


दिगंबरी  जैन  धर्मियांचे   महंत  तात्या भैया यांनी  श्वेतांबर पंथियांवर आरोप केले. ते म्हणाले की, दिगंबर जैन समाजाची अंतरीक्ष भगवान पार्श्वनाथ याच्या  मूर्तीचा  जो वाद आहे तो वाद एका मूर्तीचा असताना श्वेतांबर पंथियांकडून  इतर मूर्तीवर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी भाडोत्री माणसं ठेवलेले गुंड ठेवलेले आहेत. आता तर महिला बाउन्सर  ठेऊन त्या माध्यमातून आमच्या सारख्या ब्रह्मचारी महाराजांवर  जातीवाचक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न  केल्या जात आहे.


काय आरोप आहे दिगंबरी जैन समूदायाचा? 


दिगंबरी  जैन  पंथियाने   कुठलीही तक्रार  दिली तर ती नोंदवून घेतल्या जात नाही तर श्वेतांबर  जैन पंथियांकडून तक्रार होताच  गुन्हे  दाखल केले जातात असा आरोप करण्यात येत आहे. या सर्वांमध्ये  दबाव वापरून  प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे. ही सगळी यंत्रणा भारतीय जनता पार्टीच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून सुरू आहे. या मंत्र्याच्या प्रभावांमध्ये प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा  आरोप तात्या भैया  यांनी केला. 


महंत  तात्या भैया म्हणाले की, या  मोर्चाच्या माध्यमातून मी या सगळ्या सत्ताधाऱ्यांना वगैरे इशारा करू इच्छितो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला जैन समाज हा तुमच्या हक्काचा मतदार आहे आणि जर आमच्या मागण्यांचा तुम्ही विचार केला नाही तर येत्या विधानसभेमध्ये दिगंबर जैन समाजाची आम्ही ताकद दाखवून देऊ आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कमीत कमी 50 जागा आम्ही पाडू शकतो एवढी आमची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे आमच्या मागण्याचा लवकरात लवकर विचार करावा आणि जो काही प्रशासनावर दबाव  आणून आमच्यावर अन्याय  केला जातो तो बंद करून आम्हास न्याय द्यावा अशी मागणी या वेळी महंत तात्या भैया यांनी केली.


दिगंबर जैन समाजाचे जे हक्क आणि अधिकार सुप्रीम कोर्टाद्वारे मिळालेले आहेत ते सगळे अबाधीत राहावेत, त्याच्यामध्ये कोणी अतिक्रमण करू नये. वास्तविक हे मंदिर जे आहे हे मूळनिवासी महाराष्ट्रीयन दिगंबर जैन समाजाचं आहे आणि असं असताना बाहेरून आलेले गुजराती लोक त्यावर हक्क गाजवत आहेत. 


ही बातमी वाचा: