वाशीम: फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला. आम्ही अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे, असा खळबळजनक आरोप हाके यांनी केला. ते गुरुवारी वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  


यावेळी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तानाजी सावंतसारखे मंत्री जरांगेच्या उपोषणाला भेट देऊन, "मी मराठा म्हणून आलो", असे बालिश वक्तव्य करतात. आपण 12 करोड जनतेचे मंत्री, मुख्यमंत्री आहोत हे विसरून जातात. एकनाथ शिंदे यांचं सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. बेकायदेशीररीत्या कुणब्यांच्या नोंदी करून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात महाराष्ट्रामध्ये घातला जात आहे, याची आम्हाला खंत वाटते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


जरांगे पंतप्रधान आहे की राष्ट्रपती? लक्ष्मण हाके यांचा सवाल


कोण आहे जरांगे, जरांगे काय राष्ट्रपती आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगेनी काय सभागृहात ठराव घेतला आहे का, ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा. मनोज जरांगे नावाचा माणूस बेकायदेशीर घटनाविरोधी आरक्षण मागत आहे. पण ते कधीही मिळणार नाही. आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने ते नाकारले, आयोगाने नाकारलं आतापर्यंत सगळ्यांनी नाकारलं आणि घटना या गोष्टी नाकारते. तरी काही लोक मागतात आणि मग आम्हाला नाही तर कोणालाच नाही. 27-28 वर्षांचं आमचं आरक्षण संपवण्याचा काम जरांगे नावाच्या बुजगावण्याच्या हातून होतंय. मुख्यमंत्र्यांनी आमच्या जीवनात माती कालवण्याचं काम करू नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


आणखी वाचा


ओबीसी आरक्षणात वाटेकरी नाही, लक्ष्मण हाकेंना लेखी हमी मिळणार का? सरकारने 29 जूनला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक


मोठी बातमी: एकनाथ शिंदेंनी गद्दार शिक्का मिटविण्यासाठी मनोज जरांगे यांना उभं केलं, लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्याचा गंभीर आरोप