वाशिम : सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. शासकीय कार्यालयात पायऱ्या झिजवल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, अशी ओरड नेहमीच असते. अनेकदा शासकीय कार्यालयातील दफ्तर दिरंगाई हा संतापाचा आणि वादाचा मुद्दा ठरलेला आहे. काही महिन्यांपूर्वी संभाजीनगर येथील फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाबाहेर एका सरपंचाने चक्क पैशांची (money) उधळण करत विहिरी मंजूर होत नसल्याचे म्हटले होते. मंगेश साबळे यांनी हे हटके आंदोलन करुन सर्वांचेच लक्ष्य वेधले होते. आता, पुन्हा एकदा तशाच आंदोलनाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम (Washim) जिल्ह्याच्या मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला आहे. 

Continues below advertisement


मालेगावच्या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ब्राम्हणवाडा गावात अनेक गरजू नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहेत. मात्र, मालेगाव पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी घरकुलाच्या मिळणाऱ्या निधीचे पैसे आणि किस्त थांबवून लाभार्थ्यांची अडवणूक करत आहेत. जाणीपूर्वक विलंब करत नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोपी लाभार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका संतप्त युवकाने पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांसह नोटा फेकत  संताप आंदोलन केलं. यावेळी, गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओंच्या अंगावरच त्याने नोटा धळल्याचे व्हिडिओतून दिसून येते. आणखी पैसे पाहिजे का? वेळो वेळी पैशांची मागणी करत घरकुलाचा हफ्ता थांबवला जातो. लाभार्थ्यांचा पैशांचा हफ्ता थांबवत अडवणूक करत पैसे मागणी का करता? असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. 


युवकाने घरकुलाच्या लाभार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी, चक्क बीडीओंच्या अंगावर नोटांची उधळण केल्याने पंचायत समिती मालेगाव  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियातून समोर आले आहेत. 


हेही वाचा


मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं