वाशिम  : वाशिमध्ये (Washim) जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. शनिवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी धनज पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी मुलीच्या बापाला अटक केलीये. या मुलीच्या गळ्यावर आणि पाठिवर चाकूने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत असतानाच तिला कामरगाव येथील ग्रामील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. 


बापलेकीचा प्रेम हे जगात एक वेगळं प्रेम समजलं जातं. मात्र मुलगी वयात यायला लागली की वडिलांसह सर्व कुटुंबाची चिंता वाढायला लागते. हीच  चिंता एखाद्या घटनेचे कारण ठरु शकते. अशीच घटना वाशिम जिल्ह्यात घडली. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एका बापाने आपल्या 15 वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली. 


नेमकं प्रकरण काय?


वाशिमच्या मानोरा तालुक्यातील हिवरा गावात या मुलीचं कुटुंब राहत होतं. ही मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि हेच प्रेम तिच्या कुटुंबाला अडचणीचं वाटलं. तिच्या वडिलांना तिचं हे प्रेम मान्य नव्हतं. अनेक वेळा तिच्या वडिलांनी मुलीला समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला. पण मुलगी काही केल्या ऐकायला तयार नव्हती. शेवटी वडिलांनी तिच्या आत्याला तिला समाजावून सांगण्यास सांगितले. त्यासाठी कामरगाव जवळ असलेल्या एका गावात तिचे वडिल तिला सोडणार आहे. मात्र यावेळी वडिल आणि मुलीमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की तिच्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर चाकूने हल्ला केला. 


ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी देखील धावपळ केली आणि जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच सध्या या मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 


हेही वाचा : 


अहमदनगर हादरले! शेजाऱ्यांसोबत जागेच्या कारणावरुन वाद, अंगावर कार घालून महिला आणि अडीच वर्षांच्या मुलाची हत्या