अहमदनगर:  घराच्या जागेवरुन सुरु असलेला वाद हा जीवावर बेतू शकतोे याची प्रचिती अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) दिसून आलीये. शेजारी शेजारी राहाणाऱ्या दोन कुटुंबात जागेवरुन वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादाचं रुपांतर हत्येत झालं. आरोपीनं महिला आणि तीच्या अडीच वर्षांच्या मुलावर कार घालून (Ahmednaga Crime) या दोघांची हत्या केली.  काल सायंकाळी 7 वाजता हा सगळा प्रकार घडलाय. याप्रकरणी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपी सध्या फरार आहे. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला यांनी फिर्याद केली आहे. 


 शितल येनारे आणि स्वराज येनारे हे अहमदनरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हा देखील त्यांच्या घराशेजारी राहत होता. घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियाने केला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.


अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा नाहक बळी


याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर आणि येनारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहत होते. अनेक दिवसापासून जागेवरुन धुसफूस सुरूच होती. यातून अनेकदा वादावादीही झाली. भरधाव कार अंगावर घातल्याने महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती. 


एकादशी दिवशी भाजी भाकरीऐवजी साबुदाण्याची खिचडी केली, संतापलेल्या नातवाने आजीला संपवलं


भाजी भाकरी का बनून देत नाही म्हणून नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील (Majalgaon) नांदलगावमध्ये घडली आहे. आजीची हत्या करणाऱ्या नातवाला दिंद्रुड पोलिसांनी अटक केली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) घरामध्ये साबुदाण्याचा फराळ बनवण्यात आला होता. मात्र, नातवाने भाजी भाकरीचा हट्ट धरला आणि रागाच्या भरात आपल्या आजीचा खून केला. जेवणासाठी फराळ नको भाजी भाकरी का केली नाही असा जाब आजी कौशल्याबाई यांना विचारला. मला जेवणासाठी तात्काळ भाजी भाकरी बनवून देण्याचा हट्ट धरला. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून नातू राहुल याने आजी कौशल्या बाईच्या डोक्यात काठीने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.