Sunflower Cultivation : वाशीम (Washim) जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा सूर्यफुल (Sunflower Cultivation) या तेलवर्गीय पिकाच्या लागवडीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. कारण यंदाच्या रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) वाशिम जिल्ह्यात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे. सद्याच्या स्थितीत तेलांच्या किमंती वाढल्या (Oil prices increased) आहेत. तसेच जमिनीचा पोत राखण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल (Alteration in crops) करणं देखील महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊन शेतकरी सूर्यफुल पिकाची लागवड करत आहेत.


रब्बी हंगामामध्ये पारंपरिक पीक पेरा म्हणून काही दशकाअगोदर सूर्यफूल पिकाचा पेरा होत होता. मात्र, गेल्या काही दशकापासून सूर्यफूल पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. कारण वन्यजीवन प्राण्यांचसह पक्षांच्या त्रासामुळं शेकटरी कंटाळले होते. तसेच सातत्यानं कमी मिळणारे दर यामुळं शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात सूर्यफूल पिकाची पेरणी टाळली होती. मात्र, आता पुन्हा वाशीम जिल्ह्यातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. वाशिम जिल्ह्यात 25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागववड करण्यात आली आहे. 


सूर्यफूल पिकासाठी रब्बी हंगामातील वातावरण पोषक


रब्बी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बर्‍याच प्रमाणात सहन करु शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. 


सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन गरजेची


गेल्या काही वर्षांपासून शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यात खरीप तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड शेतकरी करत असतात. परंतु, ग्रामीण भागातील फारच कमी शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग आणि त्यापासून मिळणारा नफा पाहाता आता सध्या शेतकरी जरा सजग होऊ लागला आहे. सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी लागते. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्या लागतात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे लागते.


महत्त्वाच्या बातम्या:


Sunflower Farming : धुळ्यातील तऱ्हाडी परिसरात सूर्यफूल पीक बहरले!