Maharashtra Politics : सलग पाच वेळा यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे (Yavatmal-Washim Lok Sabha Constituency) प्रतिनिधत्व करणाऱ्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेमधून उमेदवारी डावलण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत. मात्र,  त्यांची मनधरणी करण्यासाठी शिंदेसेनेचे उदय सामंत (Uday Samant) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज भावना गवळी यांच्या रिसोड येथील निवस्थानी भेट दिली.  यावेळी त्यांची भावना गवळी यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. विशेष म्हणजे या चर्चेनंतर भावना गवळी यांचा नाराजीचा चेंडू उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कोर्टात टोलावल्याचे पाहायला मिळाले. 


भावना गवळी यांच्या भेटीनंतर बोलतांना उदय सामंत म्हणाले की, “भावना गवळी या आधीपासूनच आमच्या नेते आहेत. उमेदवारीवरून काही जरी झालं असेल, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूरमध्ये असून, त्यांच्या आदेशाने मी भावना गवळी यांची आज भेट घेतली आहे. यावेळी भावना गवळी आणि माझी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानंतर स्वतः भावना गवळी मोबाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्या आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढील दोन दिवसात भावना गवळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांच्या मातोश्री मुंबईत आजारी असल्याचा आम्हाला कळले आहे, त्यांची देखील विचारपूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज रात्री किंवा पुढील दोन दिवसात भावना गवळी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करतील. त्यानंतर योग्य तो सकारात्मक निर्णय घेतील, असे उदय सामंत म्हणाले.


कोणताही राजकीय अन्याय होणार नाही


काही गोष्टी भावना गवळी यांनी माझ्या कानावर घातल्या आहे. त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील सविस्तर चर्चा झाली आहे. हजारो लोकांच्या समोर भावना गवळी माझी सख्खी बहिण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही राजकीय अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. त्याच दृष्टीने मुख्यमंत्री कार्यवाही करतील या अनुषंगाने मी भावना गवळी यांच्याशी भेट घेतली असून चर्चा केल्याचा उदय सामंत म्हणाले.


सामना वृत्तपत्राची आता कुणी दखल घेत नाही... 


राज ठाकरे यांनी महायुतीला जो पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो. पण मला एक गोष्ट लक्षात आली नाही, राज ठाकरेंच्या निर्णयाचं सामनामधून समर्थन कसं होऊ शकते. सामनामधून त्यांच्यावर टीकाच होणार आहे. सामनामधून मुख्यमंत्र्यांवर देखील टीकाच होणार. आता सामनाची दखल शिवसैनिक किंवा जनता घेते असं मला वाटत नाही. त्यांनी टीका करत राहावी, आम्ही 45 पेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकणार आहोत. 


कुठल्याही राज्यकर्त्याला कायमस्वरूपी संपवून राजकारण होत नाही


नाना पटोले यांच्या अपघातावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, "नाना पटोले यांच्या प्रकृतीची मी देखील विचारपूस करेल, त्या अपघाताची काही शंका येत असेल, तर पोलीस त्या दृष्टीने तपास करतील. परंतु कुठल्याही राज्यकर्त्याला कायमस्वरूपी संपवून राजकारण होत नाही, एवढी मॅच्युरिटी नक्कीच महायुतीच्या नेत्यांनमधे आहे.”


इतर महत्वाच्या बातम्या : 


Eknath Shinde: भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही; यवतमाळच्या सभेत एकनाथ शिंदेंची गॅरंटी