Washim News Update  : वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात राहणाऱ्या  अमित अग्रवाल या उच्चशिक्षित तरुणाने स्वत: चा उद्योग उभा करून तो यशस्वी केलाय. या उद्योगातून अमित याने अनेकांना रोजगार दिलाय. एवढेच नाही तर खासगी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग उभा करून अनेक हातांना रोजगार देता येतो हा संदेश देखील दिलाय. घरगुती विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर निर्मितीचा उद्योग अमित याने सुरू केला आहे. 


अमित याने  अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या  गावातच स्वत:ची कंपनी सुरु करण्याचा निश्चय केला. यातून स्वत:सह इतरांना देखील रोजगार मिळेल असा अमितचा उद्देश होता.  त्यासाठी त्याने काही लाख रुपये खर्चू करून   घरगुती विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर निर्मितीचा उद्योग सुरु केला. त्याने 2018 मध्ये आपला उद्योग सुरू केला. उद्योग सुरू केल्यानंतर अगदी काही मिन्यांतच त्याच्या उद्योगातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ लागली. सध्या त्याच्या कंपनीत 15 तरूण काम करतात असे अमित सांगतो.    


अमित सांगतो, "वाशीम जिल्ह्या म्हणजे मागासलेला जिल्हा अशी आमच्या जिल्ह्याची ओळख. उद्योग धंदे नसल्याने जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात औद्यागिक वसाहत  90 टक्के रिकाम्याच आहेत.  त्यामुळे  जिल्ह्यातील नागरिकांना आणि मजुरांना कामाच्या शोधात  इतर जिल्ह्यात जावे लागते.  उच्च शिक्षित तरुणांना देखील नोकरीच्या संधी शोधण्यासाठी  इतर जिल्ह्यात जावे लागते. परंतु, आपल्याच जिल्ह्यातील तरूणांना नोकरी मिळेल आणि आपल्यालाही रोजगाराचे साधन मिळेन म्हणून स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. 


सुविधांचा अभाव असताना ISI मार्काच्या  अटी  शर्तींचे पालन करत अमितच्या उद्योगाने  गगन भरारी घेत आज वार्षिक पाच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.  सुरवातीला अनेक अडचणी आणि सल्ल्या अभावी  छोट्या शहरात व्यवसाय कसा सुरु कराल असं अनेक जण हिणवत असत.  मात्र इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अमित यांने हा व्यवसाय सुरु केला. मात्र इतर कंपन्यांच्या तुलनेत बाजार पेठेत  आपलं उत्पादन पटवून सांगणे आणि विकणे  कठीण असताना मेशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन यासह इतर  कंपन्यांच्या माध्यमातून विक्री  सुरु केली. मार्केटिंग  वेगळ्या पद्धतीने  सुरु करून  सोलापूर, अहमदनगर, विदर्भासह  छत्तीसगडपर्यंत उत्पादनाची विक्री केली, असे अमित सांगतो.  


वडिलांच्या सिमेंट विक्रीच्या छोट्या उद्योगातून मिळालेल्या आर्थिक मदतीसह मार्गदर्शन आणि  जिद्दीच्या जोरावर युवा अमित याने  इतर तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. नोकरीच्या  मागे न लागता काही तरुणांनी एकत्रित  येवून विविध प्रकारचे उद्योग सुरु केले तर आपण देखील कमी  पगाराची नोकरी न करता जिद्द चिकाटी ठेवून उद्योजक बनू शकतो हा संदेश देण्याचा प्रयत्न अमितच्या उद्योगातून होत आहे.  


महत्वाच्या बातम्या


Ranjit Shinde Exclusive : सोलापूर जिल्ह्यात 'गाव तिथं डेअरी', सहकारी दूध संघाचा निर्णय, शेतकऱ्यांना फायदा होणार का? 


Drone : वर्ध्यातल्या रँचोची कमाल, शेतीच्या फवारणीसाठी बनवला ड्रोन, 10 मिनिटात एक एकर फवारणी