समृद्धीवर भीषण अपघात; साईबाबांचे दर्शनानंतर शिर्डीहून चंद्रपूरला परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, सातजण गंभीर जखमी
अचानक समोर आलेल्या वनगाईमुळे हा अपघात झाला. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.
वाशीम : महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार करण्यात आला. समृद्धी महामार्ग घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समृद्धी मार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या कमी होत नाही.समृद्धी महामार्गावर सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही आपघात थांबत नाही. मंगळवारी शिर्डीच्या साईबाबांचे (Shirdi Saibaba) दर्शन घेऊन चंद्रपूरला (Chandrapur) जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नाही. मात्र सात जण गंभीर जखमी झाले आहे.
या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. म वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत.चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन घराकडे चालले होते. या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक नीलगाय आडवी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या वनगाईमुळे हा अपघात झाला. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर इथं हलवण्यात आले आहे. सर्व जखमी हे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन ते चंद्रपूरला जात होते.
वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास फोल ठरले
वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे
यासंदर्भात महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीप्रमाणे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप आणि तीव्र गतीने वाहन चालवणे (over speeding) हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे समृद्धी महामार्गावर सर्वाधिक बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे गेल्याचे या अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे 12 अपघात घडले असून त्यामध्ये 44 जणांचा बळी गेला आहे. तर, ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून त्यात 33 जणांचा बळी गेला आहे. टायर फुटल्यामुळे ही चार अपघात झाले असून त्यात 10 जणांचा बळी गेला आहे.