Samriddhi Highway Accident : मागील काही दिवसांपासून अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. ज्यात एका भरधाव ट्रकने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेनंतर ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये एक ट्रक जळून खाक झाला असल्याने यात ट्रक आणि त्यामधील मालाचे मोठं नुकसान झाले आहे.


सुदैवाने या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील दोन जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात सोमवारी पहाटे 5:30 च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Expressway) वाशिमच्या कारंजा जवळ लोकेशन क्रमांक 175 ते 183 दरम्यान झाला आहे. 


अपघातात ट्रक जळून खाक, दोन जण जखमी


समृद्धी महामार्गावर आज 11 मार्चच्या सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक ट्रक (ट्रक क्रमांक PB 46W1738) हा हाट्रोजन मोनॉक्साई घेऊन नागपूरच्या दिशेन जात होता. दरम्यान, या महामार्गावरील लोकेशन क्रमांक 175 ते 183 दरम्यान काही कारणास्थाव हा ट्रक रस्त्यालगत उभा असताना, मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकला आग लागताच त्यातील चालक आणि इतरांनी ट्रकमधून पळ काढला. त्यामुळे या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अल्पावधीतच आगीने दोन्ही ट्रकवर ताबा मिळवला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धडक लागल्याने ट्रक मध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


अपघात घडल्यानंतर या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडीने तत्काळ घटनास्थाळ गाठत आग नियत्रण आणली. सध्या या आपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र अपघात आणि त्यानंतर लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी तत्काळ परिस्थिति नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.  अशातच आज झालेल्या या अपघतामुळे समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   


समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी


समृद्धी महामार्गावर आरटीओकडून (RTO) विशेष मोहीम राबवली जात आहे. समृद्धी महामार्गावर एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या टायर्स  स्थितीची ही तपासणी केल्या जात आहे.


गेल्या दहा महिन्यात तब्बल 11 हजार 500 वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली तर, गुळगुळीत टायर असलेल्या 200 पेक्षा अधिक वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे वाहनांची आणि टायरची स्थिती चांगली नसल्यास समृद्धी महामार्गावर जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :