वाशीम : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजपवर (BJP) हल्लाबोल करण्यात आला आहे. 'अमित शाह चंगूमंगूची जोडी तुम्हाला लुटायला बसली असून, तुम्ही लुटले गेले आहात. टोमॅटोचे दरावरून तुम्हाला लुटण्यात आले. टोमॅटो 200 रुपये किलो कसा विकला गेला. बाजारात नवीन टोमॅटो आला नसल्याने मग दर कसे कमी झाले. 185 रुपये प्रती किलोचा जास्त दर घेऊन लुटण्यात आल्याचा,' आरोप आंबेडकर यांनी केला.
महागाईचा बोझा वाढतोय, देश लुटला जातोय. लुट थांबवायची असेल तर भाजपला मतदान देऊ नका, तरच ही लुट थांबणार आहे. वाघाने माणसाचाचं रक्त चाटल्यावर तो वाघ माणसाची शिकार करतो. माणसाची वाघाने शिकार केल्यावर आपण काय करतो, त्या वाघाला गोळी मारतो. त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या मतातून भाजपला गोळी मारायची असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत.
स्विस बँकेला पत्र लिहण्यासाठी वेळ नाही...
पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतांना आंबेडकर म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी प्रतेकाच्या खात्यात 15 लाख येतील असे सांगितले होते. मात्र, सत्ता आल्यावर त्यांचे 15 लाख झाले आणि देश उपाशी ठेवला. मोदी म्हणाले, स्विस बँकमधील सगळे पैसे परत आणतो. स्विस बँकवाले म्हणाले तुम्ही तशी मागणी करा आणि आम्ही पैसे देतो. मात्र, आमचे पंतप्रधान एवढे व्यस्थ आहेत की, त्यांना स्विस बँकेला दोन ओळीचे पत्र लिहण्यासाठी देखील वेळ नाही. देशाचे चोरलेले पैसे बँकेत होते. मोदी यांनी मागणी केली असती तर ते पैसे परत आले असते. मात्र तशी मागणी केली जात नाही. मग ते पैसे अंबानींचे होते की, अडाणीचे होते हा संशोधनाचा विषय असल्याचे," आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान देशाचे आहे की गुजरातचे...
पंतप्रधान गुजरातवाल्यांना हात लावायला तयार नाही. उरल्या सुरल्या सर्वांना आतमध्ये टाकायला तयार आहेत, धाडी टाकल्या जात आहे. मात्र, एकही कारवाई गुजरातवाल्यांवर केली जात नाही. त्यामुळे पंतप्रधान देशाचे आहे की गुजरातचे आहेत. जर पंतप्रधान गुजरातचे असेल तर तुमचा विकास कसा होणार आहे. राज्यातील कारखाने गुजरात राज्यात जात आहेत. जो माणूस मुहूर्त नसतानाही मंदीराचं उद्घाटन करतो, शंकराचार्यांच देखील ऐकत नाही. जर उद्या देशाच्या आर्मी चीफचं देखील ऐकल नाही तर देशाचं वाटोळं होईल, असेही आंबेडकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: