वाशिम : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस (Congress) एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर डिपॉझिट जप्त होईल अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. तसेच मुस्लिमांनी मनात आणलं तर भाजपच्या 48 पैकी 40 जागांचे मोठं नुकसान होऊ शकेल असंही ते म्हणाले. 


काय म्हणाले डॉ. प्रकाश आंबेडकर?


मुस्लिमांनी  योग्य  उमेदवाराला  मतदान केलं तर भाजपच्या 40 टक्के उमेदवारांचा आणि काँग्रेसच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होईल. इंडिया आघाडीचं जे झालं ते महाविकास आघाडीचं झालं तरीही मुस्लिमांच्या हाती राजकीय खेळी राहू शकते. 


भाजपने मुस्लिमांना ब्लॅक आऊट केलंय, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. याच कारणामुळे मुस्लिमांना आता सेक्युलर पक्षांकडे जाण्याची संधी आहे. असं असताना जर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि वंचित जर वेगवेगळे लढले तर तर धर्माचं राजकारण संपूण जाईल, कारण त्यावेळी सर्वच उमेदवार हे हिंदू असतील. त्यानंतर समाजाचं राजकारण सुरू होईल. अशावेळी जो आपल्या समाजाचे मत घेऊल क्रॉस व्होटिंगसाठी प्रयत्न करेल, जो मोठ्या समाजाचा असेल त्याला मुस्लिमांनी मतदान करावं. म्हणजे तो उमेदवार हा भाजपला चांगली लढत देऊ शकेल.


मुस्लिमांनी डोकं लावून मतदान केलं तर 48 पैकी 40 जागांवर भाजपचं मोठं नुकसान होणार आहे. काँग्रेस जर एकट्याने लढली तर त्यांच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होणार आहे. 


काँग्रेसने इतर पक्षांना आदर द्यायला पाहिजे 


या आधीही सोलापूरमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, काँग्रेस जर एकटी मोदींना हाताळू शकली असती तर त्यांनी इतरांना बरोबर घेतले नसते. जर तुम्ही ताकतवान नाही आणि इतरांना बरोबर घेता त्यावेळी तुम्ही त्यांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि इतरांना शेअर करायलाही शिकले पाहिजे. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे, काँग्रेसने येथे आदर द्यायला आणि शेअर करायला शिकले पाहिजे. तुम्ही जागांची बाहेर कितीही अवास्तव मागण्या केल्या तरी बैठकीत बसल्यावर वास्तवाचं भान ठेवले पाहिजे असा सल्ला दिला. ज्यावेळी इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यावेळी नितीशकुमार यांच्याकडेच तो पुढाकार ठेवायला पाहिजे होता. यात ज्या कुरघोड्या झाल्या आणि काँग्रेसने दुसरी यात्रा काढली यात इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना घेतले गेले नाही ते फारच लागले असे मला वाटतंय. 


ही बातमी वाचा: