Prakash Ambedkar :  शिवसेना ठाकरे गटासोबत (Shiv Sena UBT) आमची युती आहे. पण, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणाला भितात हे माहित नसल्याचे वंचिच बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. महाविकास आघाडीकडून आम्हाला बैठकीचे आमंत्रण आले आहे. 30 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आमच्या पक्षाचे प्रतिनिधी जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


उद्धव ठाकरे हे वंचित सोबत असलेल्या युतीबाबत उघडपणे का बोलत नाहीत असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना  विचारला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे कोणाला भितात हे मला माहित नसल्याचे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी मी कुठल्या ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत नाही. कोणाची हकालपट्टी करा ही माझी भूमिका नाही. कोण त्यांच्या उपयोगात आहे आणि कोण नाही हे ज्या त्या पक्षांनी त्यांचे ठरवावे असेही त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी सोबत चर्चा करण्याचे निमंत्रण आले आहे. उद्या आम्ही चर्चा करायला जाणार आहोत. मात्र मी न जाता आमच्या पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 


एकनाथ शिंदे आता मोठे नेते, ओबीसीमधून फडणवीस बाद!


मराठा आरक्षण निर्णयाने एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेते झाले असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षण संदर्भात निघालेल्या अध्यादेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेते झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजप आता ओबीसीमधून बाद झाली अशी परिस्थिती  असून त्यांच्यातील भांडणे लवकरच बाहेर येतील असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


छगन भुजबळ हे राजीनामा का देत नाहीत...


छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा का देत नाहीत असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. एका बाजूला मंत्रीमंडळातले सर्व फायदे घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या बाजूने राहायचे असे भुजबळ वागत आहेत. छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा असे आव्हानही आंबेडकरांनी दिले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :