वाशिम : सध्या राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ( Unseasonal Rain ) आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने विदर्भासह (Vidharbha) राज्यातील अनेक भागांत अवकृपा केली आहे. त्यामुळे अवेळी पडलेल्या या पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. विदर्भातील बहुतांश भागात हाता तोंडाशी आलेल्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच या अवकाळी पावसामुळे एक दिलासादायक बाब पुढे आली आहे. कधी नव्हे ते वाशिमच्या  (Washim) तोंडेगाव येथून वाहणारी चंद्रभागा नदी ऐन हिवाळ्यात प्रवाही झाली आहे. त्यामुळे या परिसरात आनंद व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे ही नदी उन्हाळ्यात जेमतेम वाहत असल्यामुळे आता झालेल्या अवकाळी पवसामुळे चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.


भर पावसाळ्यात नदी जेमतेम; मात्र 2 दिवसाच्या पावसाने नदीला पुर  


यंदा राज्यात बहुतांश ठिकाणी अपेक्षे प्रमाणे पाऊस न झाल्याने आणि वेळे आधीच पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात आली होती. अनेक भागात तर जलाशयांनी जेमतेम पातळी गाठली होती. अशीच काहीशी परिस्थिती वाशिम जिल्हयातील तोंडेगाव येथून वाहणारी चंद्रभागा नदीची होती. या भागात पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने या दिवसांमध्ये नदी एकदाही प्रवाही झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसात जिल्हात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे चंद्रभाग नदी दुथडी भरून वाहते आहे. पावसाळ्यात दांडी दिलेल्या पावसाने ही उणीव हिवाळ्यात  भरून काढली असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.


हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे निकसान


अवकाळीने विदर्भातील (Vidharbha) बहुतांश जिल्ह्याला अक्षरक्ष: झोडपुन काढले असताना थंडीने देखील जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असून थंडीनेही जोर धरला आहे. या अवकाळी मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा,इत्यादीसह फळबागा, पालेभाज्यांना बसला आहे. विदर्भातील गोंदिया भागात धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून या अवकळी पावसाचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. तर तिकडे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज परिसरात काल मध्यरात्री पासून मूसळधार अवकाळी पाऊस बरसतो आहे. या अवकाळी पावसामुळे गुंज गावातील नाल्याला पुर आला आहे. विदर्भातील चंद्रपूरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काल रात्री अचानक आलेल्या पावसाने जिल्ह्यातील बळीराजावर मोठं संकट ओढवले आहे. वेचणीला आलेला कापूस, कापणीवर आलेला धान आणि फुलावर असलेल्या तूर या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच रब्बीच्या चना आणि गहू पिकाला देखील या नुकसानीची झळ पोहचणार शक्यता आहे.