Agriculture News : वाशीम बाजार समितीमध्ये (Washim Bazar samiti) सोयाबीनला या हंगामातील उच्चांक दर (Soybean Price) मिळाला आहे. प्रती क्विंटलला सोयाबीनला 5 हजार 451 रुपयांचा दर मिळाला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या वर्षभरापासून पडलेल्या सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचं चित्र आज वाशिम बाजार समितीमध्ये पाहायला मिळालं.
वाशीम बाजार समितीमध्ये सोयाबीनला यावर्षीच्या हंगामातील उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटलसाठी 5451 रुपयांचा दर मिळाला असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षभरापासून 4 हजार 200 ते 4 हजार 800 दरम्यान विक्री होणाऱ्या सोयाबीनला ऐन सणासुदीच्या काळात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या काळात दरवाढ होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. वाशीम बाजार समितीमध्ये आज 15000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
गेल्या काही दिवसापूर्वी दरात झाली होती घसरण
गेल्या काही दिवसापूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. शुभारंभालाचा सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. राज्यातील काही जिल्ह्यात सोयाबीनला 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळत होता. या मिळालेल्या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडात पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत होते. अशातच वाशिम बाजार समितीमधून एक दिलासादायक बातमी समोर आल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.
सोयाबीनचे दर का पडलेत?
केंद्र शासनाने सोयाबीन तेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तेल आणि सोयाबीन ढेप आयात होत असल्याने बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत. पुढील काळात हे दर काय असतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे. दसरा दिवाळी या सणांच्या तोंडावर महागाई कमी करताना शेतकऱ्यांच्या शेत-मालावर त्यांचे गंभीर परिणाम होतानाचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे. यातून शेतकयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी सोयाबीनवर येलो मोझेकचा प्रादुर्भाव
विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच संकटात सापडले आहेत. याच कारण आहे 'येलो मोझाक'. सोयाबीन पिकावर ऐन मोक्याच्या काळात येलो मोझेक या व्हायरसनं आक्रमण केल्यानं वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), अकोला (Akola), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन 40 ते 45 टक्के घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तर कापसावर ही मर रोगाचा (Fusarium Wilt) प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: