वर्धावर्ध्याच्या (Wardha News)  कारंजा तालुक्यातील वाघोडा (Waghoda Robbery)  येथे रात्रीत फार्म हाऊसवर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे वाघोडा येथे फार्म हाऊस आहे.रात्री सात ते आठच्या वेळी आलेल्या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवला. दरोडा घालत 55 पोते सोयाबीन,सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार  शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले आहे. 


 नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊसवर येत असतात.त्यांचे पीक आणि शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेऊन असते. रात्री मध्यरात्री दरम्यान दोन जणांनी त्यांचा दरवाजा ठोठावला त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच  पाच ते सहा जण अचानक तेथे आले व त्यांनी त्यांना मारण्यास व धमकविण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊसवर नारायण पालीवाल (80 वर्ष),  त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल  (50 वर्षे) आणि हरिकुमारी पालिवाल  (70 वर्ष) हे उपस्थित होते.या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला व त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. रविवार रात्री हा सर्व थरार सुरू होता.


अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल 


दरोडेखोरांनी कपाटातील सामानाची देखील उचकापाचक करत बाहेर फेकून दिले. यानंतर  दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी देत दरोडेखोर पसार झाले. यानंतर हरिकुमारी  यांनी आरडाओरड केली.  मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी धुळे पोलिस ठाण्यात  तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 धाराशिवमधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर दरोडा


शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Robbery at Jyoti Kranti Multistate Bank) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा घातला गेल्याने एकच खळबड उडाली आहे.दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडा घातला. यात सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. सीसीटीव्हीमध्ये एकूण चार आरोपी कैद झाले आहेत.


हे ही वाचा :


Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; सहा संशयीत ताब्यात