Wardha News : दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) वरदान ठरलेली वर्ध्यातील शासकीय दुग्ध शाळा बंद (Wardha Government milk collection center) होण्याच्या मार्गावर आहे. शासनाचे सतत होत असलेलं दुर्लक्ष हे त्याचं कारण असल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर शासकीय दूध धोरणाचा मोठा फटका देखील दुग्ध शाळा आणि पशुपालकांना बसला आहे. वर्ध्याच्या (Wardha) या दुग्ध शाळेत एकेकाळी मोठ्या प्रमाणावर दुधाचे संकलन केलं जात होतं. मात्र, सध्या परिस्थिती विकट असल्याची स्थिती आहे. सर्व मशीन आणि वस्तू या धूळखात पडल्या आहेत.
वर्ध्याच्या एम आय डी सी (MIDC) भागात असलेल्या शासकीय दुग्ध शाळेत एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जात होती. या ठिकाणाहून मुंबई, नागपूर, पुणे या भागात धुदाचे वितरण केलं जात होते. मात्र, व्यवस्थापकीय उदासीनता, राजकीय हस्तक्षेप आणि दूध दराबाबतचे नकारात्मक दूध धोरण यामुळं दुग्ध शाळेच्या दूध वितरणाचा टक्का शुन्यावर आला आहे. सध्या कोट्वधींची शासकीय दुग्ध शाळा बंद आहे.
शासकीय डेअरीला कमी दर मिळत असल्यानं खासगी डेअरीकडं पशुपालकांचा कल
वर्ध्याच्या शासकीय दुग्धशाळा ही गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळं 5 जून 2022 रोजी ही दुग्ध शाळा बंद पडली होती. त्यानंतर सलग चार दिवस ही दुग्ध शाळा बंद राहिली होती. त्यानंतर पशुपालकांनी दूध खासगी डेअरीकडे दूध घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही शासकीय दुग्ध डेअरी बंद राहिली. दुसरीकडं शासनाचे दुग्ध धोरण देखील याला कारणाभूत ठरले आहे. सध्या शासन दुधाला 25 रुपयांचा दर देत आहे. तर खासगी डेअरी असणारे एक लिटर दुधाला 35 ते 40 रुपयांचा दर देत आहेत. यामुळं देखील पशुपालक शासकी डेअरीला दुध घालत नसल्याचे समोर आले आहे.
एकेकाळी 16 हजार लिटर दुधाचे संकलन
दुग्ध शाळा सुरु करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप दुग्ध शाळेत काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळं शासनाचे प्रयत्न तोकडे पडले का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. एकेकाळी 16 हजार लिटर दुधाचे संकलन वर्ध्याच्या दुग्ध शाळेत होत होते. त्यानंतर मध्यमंतरीच्या काळात हे संकलन अडीच हजारांच्या आसपास आलं होतं. मात्र, सध्या ही दुग्ध शाळा बंद अवस्थेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं पुढच्या काळात शासन याकडे लक्ष देऊन दुग्ध शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार का? दुग्ध व्यवसायिक या शासकीय डेअरीकडे पुन्हा येणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Mother Dairy Price Hike: मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर