एक्स्प्लोर

विदर्भात पावसाचा कहर! वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, तर 5 जण जखमी; पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी प्रवाहित, बळीराजाला कृषी विद्यापीठाचा महत्वपूर्ण सल्ला

Vidarbha Rain News : राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने  (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अ

Vidarbha Rain News : राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने  (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आज (28 मे)विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती चंद्रपूरसह जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.

वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी

विदर्भात पावसाने कहर केला असून अनेकांचे यात मोठं नुकसान झालं आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले आहेत. यात पहिल्या घटनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात कालीमाटी परिसरात शेतात काम करणाऱ्या सतीश फुंडे या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यात मारडा गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहे. या घटनेत पांदण रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर वर वीज कोसळली. पावसावेळी ट्रॅक्टरच्या आश्रयाने बसलेल्या आनंदराव वायरे यांचा मृत्यू झालाय. तर त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील खांबडी शिवारात हार्वेस्टरच्या माध्यमातून भात पीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्याने एक महिला आणि हार्वेस्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे मजूर जखमी झाले आहेत. कांता जीभकाटे आणि विजय सिंह अशी मृतांची नावे आहेत.

बळीराजाला कृषी विद्यापीठाचा महत्वपूर्ण सल्ला

'आपत्तीतून इष्टापत्ती' अशी आपल्या मराठीत म्हण आहे. सध्या राज्यभरात सुरू असलेला धुवाधार मान्सूनपूर्व पावसासाठी ही म्हण तंतोतंत खरी ठरतांना दिसतीये. सध्या राज्यात सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस हा खरिपासाठी अतिशय पोषक असल्याचं मत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं व्यक्त केलंय. या पावसाचा खरिपातील पिकांसाठीच्या तण नियंत्रणासाठी मोठा फायदा होणार असल्याचं विद्यापीठानं म्हटलंय. सध्याच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन विद्यापीठाने केलंय. हा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी राहिलेली मशागतीची कामे पूर्ण करावी असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिलाय. या पावसामुळे जमीन अधिक भुसभुशीत झाल्याने त्याचा फायदा मशागतीसाठी होणार असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी म्हटलंय. या पावसाचा फायदा भविष्यातील तण नियंत्रणासोबतच लागवडीनंतरच्या उगवणक्षमता वाढीसाठी होणार असल्याचं कुलगुरू डॉ. गडाख म्हणालेत.

हे ही वाचा 

Nagpur Violance News: मोठी बातमी! नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जमीन अर्ज फेटाळला; नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagarparishad Election : शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार-सूत्र
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
LPG Price Cut : व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर घटले, घरगुतीच्या वापराच्या गॅस सिलेंडरच्या दराचं काय? जाणून घ्या अपडेट 
व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर घटले, घरगुतीच्या वापराच्या गॅस सिलेंडरच्या दराचं काय? जाणून घ्या अपडेट 
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
Jaya bachchan: ''जुने घाव उकरून तुम्हाला काय करायचंय?''  अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या लग्नावर जया बच्चन याचं उत्तर, गेले 52 वर्षं मी...
''जुने घाव उकरून तुम्हाला काय करायचंय?'' अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या लग्नावर जया बच्चन याचं उत्तर, गेले 52 वर्षं मी...
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
Embed widget