![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Urfi Javed : उर्फी जावेदने दिली 'गूड न्यूज', घरी नव्या सदस्याची एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल
Urfi Javed New Car : अभिनेत्री उर्फी जावेदने नवीन कार खरेदी केली आहे.
![Urfi Javed : उर्फी जावेदने दिली 'गूड न्यूज', घरी नव्या सदस्याची एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल Urfi Javed buys new car SUV know price details Urfi Javed latest update Urfi Javed : उर्फी जावेदने दिली 'गूड न्यूज', घरी नव्या सदस्याची एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/28049af9e3d3245f35580e274751021a1678101574548254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urfi Javed : आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीने आता 'एसयूवी' (SUV) ही नवीन कार खरेदी केली आहे. उर्फीने खरेदी केलेल्या नव्या कारची किंमत 31.29 लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. कार खरेदी करतानाचा उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीने नवीन कार खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उर्फीने नवीन कार स्वत:साठी नाही तर तिच्याकडे काम करणाऱ्या तिच्या स्टाफसाठी घेतली आहे. कार खरेदी केल्यानंतर एका मुलाखतीत उर्फी म्हणाली,"एसयूवी' ही माझी दुसरी कार आहे. माझ्यासाठी काम करणाऱ्या माझ्या स्टाफला रिक्षामधून शूटिंगच्या ठिकाणी यावं लागत होतं. त्यामुळे आता माझा मॅनेजर, मेकअप आर्टिस्ट, बाउन्सर आणि टीममधील इतर सदस्य या कारने शूटिंगला येतील".
View this post on Instagram
उर्फी जावेदचा कार खरेदी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ट्रेंडी आणि युनिक आउटफिट्समुळे चर्चेत असणारी उर्फी तिच्याकडे काम करणाऱ्या मंडळींचा खूप विचार करते हे तिच्या कृतीने सिद्ध झालं आहे. आलिशान कार खरेदी केल्यानंतर उर्फीने केक कापत आनंद सादरा केला आहे.
कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण उर्फी जावेद!
उर्फी जावेद कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. दर महिन्याला ती लाखो रुपये कमावते. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार मानधन घेते. अशाप्रकारे महिन्याला ती 30 लाख रुपये कमावते. उर्फीची एकून संपत्ती 172 कोटींच्या आसपास आहे. लखनौत जन्मलेल्या उर्फीचं मुंबईत स्वत:चं आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे 25 लाख किंमतीची Jeep Compass SUV ही कारदेखील तिच्याकडे आहे.
'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फी जावेद घराघरांत पोहोचली. तिने 'दुर्गा', 'सात फेरों की हेराफेरी', 'बेहनाह', 'जीजी मां', 'डायन', 'रिश्ता क्या कहलाता है' आणि कसौटी 'जिंदगी' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. उर्फी सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून आपल्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांना घायाळ करत असते.
संबंधित बातम्या
Urfi Javed Struggle : घरच्यांच्या छळाला कंटाळून सोडलं घर, आठ दिवस काढले पार्कात; वाचा उर्फी जावेदच्या संघर्षाची कहाणी...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)