एक्स्प्लोर

संप कायम, 5 जूनला महाराष्ट्र बंद, संपकरी शेतकरी आक्रमक

अहमदनगर : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद राहिल. 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरातील शेतकरी संपावर राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे. संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Beed : 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धसांचं जयंत पाटलांना थेट आव्हान
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल
जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget