मुंबई : प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणाने केलं. चोरुनमारुन केलं नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.


मुंबईत शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील 11 ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर रश्मी ठाकरे यांची पारंपारिक पद्धतीनं ओटी भरण्यात आली. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं.

ते म्हणाले की,   मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे हे लक्षात असूदेत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. 2014 मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केली. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचं अंतरंग भगवंच आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपाला विचारायचं आहे की तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही 2014 लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज 23 जानेवारी रोजी मला सर्व जुने 23 जानेवारी आठवत आहेत. शिवबंधन बांधून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली. हा सत्कार माझा नाहीय हा तुमचा सत्कार आहे. मैदानात उतरल्यावर कधीही पळ काढला नाही आणि काढणार नाही. ही माझी वचनपूर्ती नाही तर वचनपूर्तीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे.

यावेळी ते म्हणाले की, तेव्हाच्या मित्रपक्षानं वचन मोडलं बाळासाहेबाच्या खोलीत दिलेलं वचन मोडलं. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. जे मी बोललो ते बोललो. नाहीतर तुमच्यासमोर काय तोंड दाखवलं असतं. जे अनेक वर्ष विरोधक होते त्याच्यासोबत आम्ही गेलो मात्र आम्ही ना आमचा रंग बदलला आहे आमचा रंग आहे आहे तो आहेच, असेही ते म्हणाले. स्वप्नात नसलेली जबाबदारी मी स्वीकारली असल्याचे ते म्हणाले.

मी नवीन जबाबादारी घेतल्यापासून एकही सत्कार स्वीकराला नव्हता. पण आजचा सत्कार मी स्वीकारला. कारण हा माझा सत्कार नाही. हा सत्कार तुमचा आहे. मी तुमचा कुटुंबप्रमुख आणि सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल त्या जबाबदारीपासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणार नाही, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, ही एवढ्यासाठी स्वीकारली की ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने दिलेलं वचन मोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीमध्ये दिलेलं वचन मोडलं. ते आपलं मंदिर आहे. मंदिरात दिलेला शब्द त्यांनी खाली पाडला आणि असं काही ठरलंच नव्हतं असं म्हणत मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही, लढणारा आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर जे मी बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला मी काय तुम्हाला तोंड दाखवलं असतं, असं त्यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या