Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला असं वाटलं होतं की ते भाजपची परंपरा चालवतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर चौकशी करायची देखील गरज नाही त्यावेळी मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली. ही कुठली समज? म्हणजे पुढच्या वेळेला रमी नव्हे तर तीन पत्ती खेळ, पुढच्या वेळेला बार सावली नव्हे तर भर उन्हामध्ये बांध, पुढच्यावेळी बॅग उघडी नव्हे तर बंद करून ठेव, असा हा प्रकार आहे. हे काही योग्य नाही.

Continues below advertisement


जर तुम्ही भ्रष्टमंत्र्यांना समज देऊन सोडून देणार असाल तर आमच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ वनवासात का पाठवलं? उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) सध्या कुठे आहेत? त्यांनी राजीनामा नेमका का दिला? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. पाशवी बहुमत असताना, दिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांना जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा सव करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय.


शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता?


राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवतोय, एक पैशाची बॅग घेऊन बसलय. असे असताना मात्र एक चांगली गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, मात्र सरकार चालवताना तुम्हाला कोणतं तरी मंत्रीपद द्यावं लागतं. मात्र पहिल्यांदा असं झालं की एका नेत्याला त्याच्या आवडीचं खात मिळालं. ते म्हणजे रमी मंत्री, ते क्रीडामंत्री नव्हे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता? असा सवाल करत माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली.


आजपर्यंतची राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची परंपरा होती, पण....


भ्रष्टाचारांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील सत्ताधारी भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्र भ्रष्टाचारात आघाडीवर तर विकासात सर्वात मागच्या रांगेत नेऊन ठेवला आहे. खरंच आम्हाला तुमची लाज वाटते. राज्यात आपले सरकार असताना ज्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळी मंत्र्यावर आरोप झाल्यास त्याचा राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची आजपर्यंतची परंपरा होती. मी देखील मुख्यमंत्री असताना काही मंत्र्यांचे राजीनामा घेतले. वनमंत्री असलेल्या नेत्यावर अतिशय वाईट आरोप होते. त्यांना देखील वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रात देखील अशा घटना घडल्या आहेत. आरोप सिद्ध न झाल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेणे याला म्हणतात कारभार. याला म्हणतात जनताभिमुख कारभार. अलीकडचे सरकार हे जनता भिमुख नाही, तर पैसे गिळणारं सरकार आहे. अशी बोचरी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केलीय.


 



आणखी वाचा