नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागपूर येथील दोन तरुणांचा चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही चंद्रभागा नदी येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मृत्यू झालेले दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे (28, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार (27, रा. भारसिंगी) मृत तरुणांची नावे आहेत.
वाचा Monsoon Alert : राज्यात मुसळधार पावसाचे 76 बळी, विदर्भात 14 दगावले कोकणात अतिवृष्टीचा इशारा
नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा व भारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करुन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे त्यांनी ठरवले. सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला, पण चंद्रभागा नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. यावेळी काठावर बसलेल्या मित्राने आरडा-ओरडा करत त्यांना वाचवण्यासाठी लोकांना बालवू लागला. तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्या दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी या दोघांना मृत्यू घाषित केले. घटनेचा तपास पंढरपूर पोलिस करीत आहेत. या घटनेने नरखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नद्यांची पाणी पातळी वाढली, गावांचा संपर्क तुटला
राज्याच्या विविध भागात अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नीगिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांचा संपपर्क तुटला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्याती तुफान पाऊस झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. तर राज्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या