Sai Pallavi : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील साई पल्लवी (Sai Pallavi) तिच्या अभिनायनं प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकतीच सई पल्लवीनं नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध चॅट शो माय व्हिलेजमध्ये हजेरी लावली. यावेळी  तिच्यासोबत विराट पर्वम (Virat Parvam) चित्रपटामधील अभिनेता राणा दग्गुबतीही (Rana Daggubati) उपस्थित होता. या शोमध्ये साई पल्लवीनं तिच्या बालपणीचे मजेशीर किस्से सांगितले. 


साईनं सांगितला मजेशीर किस्सा 


साई पल्लवीनं माय व्हिलेज या शोमध्ये तिच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. 'जेव्हा मी इयत्ता सातवीत शिकत असे. तेव्हा एका मुलाने माझ्या शाळेच्या बॅगेत लव्ह लेटर टाकले. जे नंतर माझ्या पालकांच्या हाती पडले. त्यानंतर मी आई-वडिलांचा मार खाल्ला होता.' असं साई म्हणाली. नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन  माय व्हिलेज या चॅट शोचा एका व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 






नेटफ्लिक्सवर रिलीज होणार विराट पर्वम 
साई पल्लवी आणि राणा दग्गुबती यांचा विराट पर्वम चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली नाही. यानंतर आता हा चित्रपट 17 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित केला. त्यामुळे सई पल्लवी तिच्या चित्रपटाच्या ओटीटी प्रमोशनसाठी नेटफ्लिक्सच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती. प्रियामणी आणि नंदिता दास यांनी देखील विराट पर्वम या चित्रपटामध्ये काम केलं आहे.  राणा दग्गुबती या चित्रपटाचा निर्माताही आहे.


2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. 


हेही वाचा: