एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे दोन आमदार बेपत्ता, कुटुंबियांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सरकार वाचवण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आहे. यामुळे आमदार फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादीचे दोन आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये दाखल केली आहे.

नाशिक/शहापूर : राज्यात खळबळजनक पद्धतीने सत्तास्थापना झाल्यानंतर आता आकड्यांचा गेम सुरु झाला आहे. यामध्ये आता सरकार वाचवण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आहे. यामुळे आमदार फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. एकीकडे काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीला 15 आमदारांनी हजेरी लावल्याचं कळालं. पण त्यातले दोन आमदार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता असल्याची तक्रार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे तर तिकडे नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सकाळी पक्ष मिटिंगसाठी जातो असे सांगून गेले ते परतले नाहीत. त्यांच्याशी 10 ते 15 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांच्या मुलाने दिली आहे. त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नाहीये. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली आहे, असे त्याने सांगितले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आमदार दरोडा यांचा मुलगा करण दरोडा याने सांगितले की, माझ्या वडिलांना रात्री अजितदादांनी बोलावले आहे असा फोन आला. आम्ही रात्री अडीच वाजेपर्यंत मुंबईत आलो. मी आणि माझे वडील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यापर्यंत सोबत होतो. त्यानंतर ते एका गाडीत बसून निघाले. मी त्यांच्या गाडीच्या मागे गेलो. राजभवनापर्यंत मी त्यांच्या पाठीमागे गेलो. मात्र मला राजभवनात प्रवेश नसल्याने मी बाहेर थांबलो. त्यानंतर माझा आणि माझ्या वडिलांचा संपर्क होत नाही, असे दरोडा यांच्या मुलगा करणने एबीपी माझाला सांगितलं. दरम्यान शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचा मुक्कामही आता हॉटेलमध्ये हलवण्यात आला आहे. रात्री 9.30 च्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीची बैठक संपल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेल रेनिसान्समध्ये ठेवण्यात आलंय. तर शिवसेना आमदारांचाही हॉटेल ललितमधला मुक्काम वाढवण्यात आलाय. आणि काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला सुरक्षितस्थळी नेण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाणांनी दिली..

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Prichard Colon Death at 33 : 221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget