Viral Vide On Social Media : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यातील काही व्हिडीओ फनी तर, काही धोकादायक स्टंटचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोहल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ट्रक ड्रायव्हर गाडी चालवताना करताना स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या या उलटसुलट करामती पाहून लोक घाबरून गेले होते.


या व्हिडीओमध्ये ट्रक ड्रायव्हर स्टिअरिंगवर बसून नाचतोय, तर कधी स्टिअरिंग सोडूनही नाचतोय. यादरम्यान त्याला अपघात होण्याची भीतीही वाटत नाही. ट्रक ड्रायव्हरची ही करामत पाहून लोक घाबरले. पण, त्याला भीती वाटली नाही. हे कसं शक्य झालं ते व्हिडीओच्या शेवटी कळतं.


व्हिडीओमध्ये मजेदार ट्विस्ट!


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस ट्रक चालवताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी त्याला मजा येऊ लागते आणि तो आपली जागा सोडून इकडे तिकडे पाहू लागतो. इतकंच नाही, तर तो दाराला लटकतो आणि स्टेअरिंग मध्येच सोडून नाचू लागतो. आता तुम्ही पण विचार करत असाल की, ट्रक एवढा वेगात असूनही हा ड्रायव्हर असा वेड्यासारखा कसा काय वागतोय? काहींना रागही आला असेल. पण, या व्हिडीओच सत्य काही वेगळंच आहे. व्हिडीओच्या शेवटी एक मजेदार ट्विस्ट आहे. वास्तविक, ज्या ट्रकमध्ये हा चालक बसला आहे, तो ट्रक दुसर्‍या ट्रॉलीवरून वाहून नेला जात आहे. अर्थात हा ड्रायव्हर स्वतः ट्रक चालवत नाहीय.



लोकांनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया!


काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओला भरपूर लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘हा वेडेपणा आहे’. काही लोकांनी हा व्हिडीओ संपूर्णपणे न पाहता त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. काही लोकांना वाटले की, हा स्टंट व्हिडीओ असणार आहे, मात्र हा एक मजेदार व्हिडीओ आहे. शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हालाही हसू येईल.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha