Zomato Viral Tweet : सोशल मीडियामुळे (Social Media) संपूर्ण जग जवळ आलं आहे. यामुळे सोशल मीडिया मार्केटिंगही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा फायदाही होताना दिसतो. सोशल मीडियावर कोणताही फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट व्हायरल व्हायला अगदी काही सेकंद पुरेसे असतात. सध्या सोशल मीडियावर एक ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. हे ट्वीट आहे फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचं. 

Continues below advertisement


एक्स-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटोचा वापर


एका तरुणीने झोमॅटोचा वापर करुन एक्स-बॉयफ्रेंडला त्रास द्यायचं ठरवलं. त्यावर झोमॅटोनं तरुणीला आवाहन करत ट्वीट केलं. त्यामुळे ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाची उमटल्या आहेत. झोमॅटोने भोपाळमधील अंकितासाठी केलेलं हे खास ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 






झोमॅटोचं ट्विट व्हायरल


झोमॅटोनं ट्वीट करत लिहिलं आहे की, 'भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या एक्स-बायफ्रेंडला व्यक्तीला कॅश ऑन डिलिव्हरीवर फूड पाठवणं थांबवा. ही तिसरी वेळ आहे. तो पैसे देण्यास नकार देत आहे!' दरम्यान, ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.


नेमकं घडलं काय?


एका तरुणीने एक्स-बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी झोमॅटो फूड डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर केला. या तरुणीने एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाने फूड डिलिव्हरी ऑर्डर केली. ही फूड डिलिव्हरी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर मागवली आणि ही ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी होती. यामुळे तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला चांगलाच त्रास झाला. एवढंच नाही, तर या तरुणीने एक किंवा दोन नाही, तर तीन वेळा अशाच प्रकारे कॅश ऑन डिलिव्हरी फूड ऑर्डर केलं. यावेळी संबंधित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने मात्र, झोमॅटोनं थेट ट्वीट करत अंकिताला आवाहन केलं आहे.


आता नेटकऱ्यांनाही सुचली कल्पना


दरम्यान, आता ही अंकिता खरी आहे की काल्पनिक आहे हे गूढचं आहे. पण झोमॅटोच्या या ट्वीटमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटलं आहे की, “मला वाटते….अंकिताने मला नुकतीच एक युक्ती दिली आहे”, आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हाहाहा, अंकिताच हे करत असेल, आता अनेकांना यावरून कल्पना येईल,” तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “मी पण आता करून पाहणार आहे.”


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Job Resignation : 10-10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक का? भडकणाऱ्या बॉसला वैतागली, तरुणीने तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली!