Online Banking Security Tips : ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच बँक फसवणुकीचा धोकाही वाढतो आहे. ऑनलाइन बँक फसवणुकीच्या घटना दररोज समोर येत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी, बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क करतात आणि वेळोवेळी सुरक्षा टिप्स देतात. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे ऑनलाइन बँकिंग सुरक्षा टिपा दिल्या आहेत.


या टिप्स तुमचे व्यवहार आणि पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत करु शकतात


संशयास्पद पॉप अप पासून सावध 
जेव्हा ब्राउझ करत असाल तेव्हा संशयास्पद पॉप अप पासून सावध रहा. कारण तुम्ही मालवेअरला बळी पडू शकता.


सुरक्षित पेमेंट गेटवे तपासा 
ऑनलाइन पेमेंटमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, नेहमी सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा. ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी, सुरक्षित पेमेंट गेटवे (URL आणि https://- पॅड लॉक चिन्ह) तपासून पाहा.


ई-मेल संदेशाद्वारे वेबसाइटला भेट देऊ नका 
वेबसाइटला भेट देण्यासाठी ई-मेल संदेशातील लिंकवर कधीही क्लिक करू नका. ई-मेलमधील लिंक व्हायरस किंवा मालवेअर हल्ल्यांना असुरक्षित असू शकतात.


फक्त URL टाइप करून बँकेच्या वेबसाइटवर पोहोचा
ग्राहकांनी नेहमी त्यांच्या अॅड्रेस बारमध्ये फक्त URL टाइप करून त्यांच्या बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन केले पाहिजे.


पासवर्डमध्ये वैयक्तिक पासफ्रेज वापरा
ग्राहकांनी त्यांचा पासवर्ड तयार करताना नेहमी वैयक्तिक सांकेतिक वाक्यांश वापरावा. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ, उदाहरणार्थ, जर मला लाल रंग आवडला तर तो पासवर्ड बनवला, तर iLIke3Red@cOLor तो असा बनवू शकतो.


पिन, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक गोपनीय ठेवा.
ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन), पासवर्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, CVV क्रमांक आणि इतर सर्व वैयक्तिक डेटा गोपनीय ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे इतर कोणाशीही शेअर करू नका.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live