Bengaluru News : कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून येमेनच्या नागरिकाला जीवदान दिलं आहे. डॉक्टरांनी (Doctor) येमेनी नागरिकांवर (Yemen Man) शस्त्रक्रिया (Operation) करून त्याच्या डोक्यात 18 वर्षांपासून अडकलेली गोळी यशस्वीरित्या बाहेर काढली. या व्यक्तीवर 18 वर्षांपूर्वी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या व्यक्तीचे दोन्ही कान बहिरे झाले होते. येमेनमध्ये खूप वर्ष उपचार करुनही त्याला या समस्येपासून सुटका मिळाली नव्हती. अखेर या येमेनी नागरिकाने भारतात यायचा निर्णय घेतला आणि बंगळुरुमधील डॉक्टरांनी त्याला जीवदान दिलं


येमेनी नागरिकाला भारतात मिळालं जीवदान


या येमेनी पुरुषावर बंगळुरु येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीच्या डोक्यातून तीन सेंटीमीटरची गोळी काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रूग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याची प्रकृती एकदम ठीक  असून, तो मायदेशी येमेनला परतला असल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे.


18 वर्षांपूर्वी डोक्यात अडकली बंदुकीची गोळी


बंगळुरूच्या एस्टर आरव्ही हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपूर्वी दोन्ही गटांमध्ये भांडण झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं की, यावेळी गोळीबारही झाला. या गोळीबारामध्ये व्यक्तीच्या डोक्यात गोळी घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. गोळी लागल्यानंतर तो बहिरा झाला होत आणि त्याला दोन्ही कानांनी काहीही ऐकू येत नसल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या व्यक्तीने अनेक मोठं-मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला, पण सर्वांनी त्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने तो निराश झाला होता. पण त्याने हार मानली नाही. अखेर त्याने उपचारासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्याने बंगळुरुमध्ये एस्टरने आरव्ही हॉस्पिटलमध्ये येऊन ऑपरेशन केलं.


'गोळी कानामागच्या हाडात खोलवर अडकली होती'


रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोळी डाव्या टेम्पोरल बोनमध्ये खोलवर एम्बेड करण्यात आली होती, ज्यामुळे शस्त्रक्रियेचे मोठं आव्हान होतं. गोळी काढताना चूक झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होता. एस्टरने आरव्ही हॉस्पिटलमधील डॉ. रोहित उदय प्रसाद आणि डॉ. विनायक कुर्ले यांच्या नेतृत्वाखालील ईएनटी शल्यचिकित्सकांच्या पथकाने रुग्णाच्या कानातली तीन सेंटीमीटर लांबीची गोळी यशस्वीरीत्या काढल्याचं रुग्णालयानं सांगितलं आहे.


'बुलेट शोधण्यात अडचणी आल्या'


रूग्णालयाने सांगितलं की, बुलेटच्या स्थानामुळे सर्जिकल टीमला स्पष्ट इमेजिंग मिळवण्यात अनेक समस्या आल्या. तसेच त्याच्या डोक्यात धातू असल्याने एमआरआयमध्येही ते आढळून आलं नाही. गोळी शोधण्यासाठी सीटी अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर डोक्यात गोळी नेमकी कुठे आहे, हे सापडलं.


'अनेस्थेसिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली'


डॉक्टरांनी एक्स-रे इमेजिंग देखील वापरलं. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. गोळी काढण्यासाठी आजूबाजूचे हाड काळजीपूर्वक काढून जनरल ऍनेस्थेसिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांना बुलेटभोवती एक तंतुमय कॅप्सूल सापडलं, ज्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या संरचनांना चिकटण्यास अडथळा निर्माण होत होता, ज्यामुळे रुग्णाला ऐकायला येत नव्हते. डॉक्टरांनी गोळी यशस्वीपणे काढली, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.