मुंबई : अवघ्या काही दिवसांमध्ये 2023 हे वर्ष संपेल (Year Ending) आणि 2024 ची सुरुवात होईल. पण तुम्ही यंदाच्या वर्षात किती वर्षांचे झालात किंवा तुमच्या घरातलं कोणी यंदाच्या वर्षात किती वर्षांचं झालं हे तुम्ही अगदी सहज जाणून घेऊ शकता. कारण सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक चार्ट तुफान व्हायरल होतोय. या चार्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचं वय अगदी सहज जाणून घेऊ शकता. त्यामुळे आता तुम्हाला तुमचं वय जाणून घेण्यासाठी कोणत्याही कॅलक्युलेटरची गरज भासणार नाही. 


यंदाचं वर्ष संपत आलं आहे. त्यातच प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील देखील एका वर्षाचा टप्पा पूर्ण केलाय. सरत्या वर्षात अनेक नव्या गोष्टी घडल्या असतील, नवी माणसं भेटली असतील पण यामध्ये एक गोष्ट प्रकर्शाने जाणवते ते म्हणजे आपलं वय. त्यामुळे तु्म्हालाही जर जाणून घ्यायचं असेल की 2023 मध्ये तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या आजी आजोबांपासून ते अगदी तुमच्यापर्यंत कोण किती वर्षांचं झालं ते जाणून घेता येईल. 


चार्टमध्ये कोणत्या वर्षांचा समावेश


या चार्टमध्ये 1943 ते 2022 या वर्षांमध्ये जन्मलेल्या लोकांचं वय सांगण्यात आलं आहे. म्हणजे जर तुमचा जन्म 1943 सालचा असेल तर यंदाच्या वर्षात तुम्ही किती वर्षांचे झाले असाल याविषयी या चार्टमधून तुम्हाला जाणून घेता येईल. म्हणजे जर तुमचा जन्म 1943 चा असेल तर 2023 मध्ये तुम्ही 80 वर्षांचे झाले आहात, हा सरळ आणि साधा हिशोब तुम्हाला या चार्टमधून समजू शकेल. अशाप्रकारे यामध्ये 1943 ते 2022 पर्यंतची यादी आहे. 


अनेकदा आपलं वय सांगताना गोंधळ होतो. चालू वय की पूर्ण झालेलं वय यामध्ये संभ्रमही निर्माण होतो, त्याचसाठी हा चार्ट तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरु शकेल. तसेच यामध्ये तुमचे आजी आजोबा, आई  वडिल, भाऊ बहिण यांची देखील वयं जाणून घेता येईल. त्यामुळे तुम्ही कोणत्या वर्षात जन्मले आहात किंवा तुमच्या घरात कोणी जन्मलं आहे, त्यांच्या जन्म वर्षानुसार ते किती वर्षांचे झाले असतील हे जाणून घ्या. 



हेही वाचा : 


Indian Citizenship : जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाचं मूल भारतात जन्मलं तर त्याला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळेल?


New Year 2024 : नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नसाल, तर घरच्या घरी 'असं' करा नवीन वर्षाचं स्वागत