Quintessential Grilled Cheese Sandwich : चटपटीत अन्नपदार्थ (Fast Food) खायला जवळजवळ प्रत्येकालाच आवडतं. त्यातच फास्ट फूड म्हणजे प्रत्येकाच्या जणू जिव्हाळ्याचा विषय आहे. वडापाव, पाणीपुरी, मोमोज, फ्रँकी असो किंवा सँडविच, या पदार्थांचे नाव जरी घेतले तरी, त्यांची चव जिभेवर रेंगाळते. तुम्ही अनेक महागडे अन्नपदार्थ खाल्ले असतील. पण तुम्ही जगातील सर्वात महागड्या सँडविचबद्दल ऐकलं आहे का? ब्रेडचे दोन स्लाईस, कांदा, बटाटा, भोपळी मिरची, टोमॅटो, काकडी आणि चीज (Cheese) यांपासून बनलेलं सँडविच. एखाद्या सँडविचची किंमत जास्तीत जास्त शंभर, दोनशे हजार किंवा दोन हजार असू शकते. पण जगात असंही एक सँडविच आहे जे खरेदी करण्यासाठी अनेक लोकांचा एका महिन्याचा पगार खर्च करावा लागेल. हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे. 


जगातील सर्वात महागड्या सँडविचच्या विक्रमाची नोंद झाली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात महागड्या सँडविचची किंमत 17,000 रुपये आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते खाण्यासाठी तुम्हाला दोन दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागते. त्यामुळे कुणालाही वाटेल तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाऊन हे सँडविच खाता येणार नाही. त्यासाठी प्री ऑर्डर द्यावी लागेल.


सर्वात महाग सँडविच कुठे मिळतं?


न्यूयॉर्कमधील (New York) सेरेंडिपिटी 3 (Serendipity 3) या रेस्टॉरंटमध्ये जगातील सर्वात महागडे सँडविच मिळते. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटवर दिलेल्या रिपोर्टनुसार, सेरेंडिपिटी 3 रेस्टॉरंटमधील क्विंटएसेंशियल ग्रिल्ड चीज सँडविच (Quintessential Grilled Cheese Sandwich) जगातील सर्वात महागडे सँडविच आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली आहे.


हे सँडविच इतकं महाग का आहे?


हे ग्रील्ड चीज सँडविच बनवण्यासाठी वापरलेले साहित्य खूप महाग आहेत. यामुळेच, या सँडविचची किंमत 17,000 रुपये आहे. या सँडविचमध्ये फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेडचे दोन स्लाईस वापरण्यात येतात. फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेड हा डोम पेरिग्नॉन शॅम्पेन आणि खाण्यायोग्य गोल्ड फ्लेकपासून बनवला जातो. त्यात पांढरे ट्रफल बटर असते आणि त्यासोबत ब्रेडच्या स्लाईसमध्ये कॅसिओकाव्हलो पोडोलिको चीज टाकले जाते. दक्षिण आफ्रिकन लॉबस्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉस आणि ज्या बॅकरॅट क्रिस्टल प्लेटवर हे सँडविच सर्व्ह केले जाते, त्या सर्व गोष्टींची किंमत खूप जास्त आहे, म्हणून याला जगातील सर्वात महाग सँडविच म्हटले गेले आहे.


या रेस्टॉरंटमध्ये इतरही अनेक महाग पदार्थ आहेत


Serendipity 3 या रेस्टॉरंटमध्ये फक्त सर्वात महागडे सँडविचच नाही तर सर्वात महागडे डेझर्ट, सर्वात महाग हॅम्बर्गर, सर्वात महाग हॉट डॉग आणि सर्वात महागडा वेडिंग केक देखील पाहायला मिळेल. मात्र, इथे हे पदार्थ लगेचच मिळणार नाहीत, तर तुम्हाला ते दोन दिवस अगोदर ऑर्डर करावे लागेल.