Solar System Intresting Facts : पृथ्वीवर (Earth) काही ठिकाणी पाऊस (Rain) पडतो काही ठिकाणी बर्फवृष्टी (Snowfall) होते. पण या जगात अशीही एक जागा आहे, जिथे चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो. हो हे ऐकून नवलं वाटणं स्वाभाविक आहे पण हे खरं आहे. आपल्या सर्वांच्या मनात बालपणी पैशांचा पाऊस पडण्याचा विचार नक्की आला असेल, अर्थात हे शक्य नाही पण या ब्रह्मांडामध्ये एका ठिकाणी पैशाचा नाही तर खऱ्या खुऱ्या हिऱ्यांचा पाऊस पडतो. आपल्या सौरमालेमध्ये एकूण आठ ग्रह आहेत. पण पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांबाबत अद्याप आपल्याला जास्त आणि पुरेशी माहिती नाही. मंगळ, गुरु, शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांबद्दल शास्त्रज्ञांना थोडीथोडकी माहिती मिळाली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांकडून अंतराळातील रहस्य शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


'या' ठिकाणी पडतो चक्क हिऱ्यांचा पाऊस


आपल्या सूर्यमालेमध्ये असे काही ग्रह आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. हे ग्रह इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळे आणि खास आहेत. या ग्रहांचे हवामानही इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळे आहे. हे वेगळे ग्रह म्हणजे नेपच्यून आणि यूरेनस. नेपच्यून ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने सुमारे 15 पट मोठा आहे. तसेच युरेनस हा ग्रह पृथ्वीच्या आकारापेक्षा सुमारे 17 पट मोठा आहे. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो. शास्त्रज्ञांच्या मते, या ग्रहांवर वातावरणाचा दबाव खूप जास्त आहे.


हिऱ्यांचा पाऊस का पडतो?


या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडण्यामागील म्हणजे येथील वातावरण आहे. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवर मिथेन वायूचे प्रमाण जास्त आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मिथेनमध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतात, त्याचे रासायनिक सूत्र CH4 आहे. ज्या प्रकारे आपल्या पृथ्वीवरील वातावरणाच्या दाबामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि नंतर पृथ्वीवर पाऊस पडतो. त्याचप्रमाणे नेपच्यून आणि युरेनस या ग्रहांवर मिथेन वायूवर दबाव निर्माण झाल्यावर हायड्रोजन आणि कार्बनचे रेणू तुटतात. यानंतर त्या कार्बनचे हिऱ्यात रुपांतर होते आणि त्यामुळे हिऱ्याचा पाऊस पडतो. हे ग्रह पृथ्वीपासून सर्वात दूर आहेत. येथील तापमानही शून्य ते 200 अंश सेल्सिअसच्या खाली असते.


येथील वाऱ्यांचा वेगही प्रचंड


नेपच्यून आणि यूरेनस या ग्रहांवर मिथेन वायू बर्फासारखा गोठून राहतो आणि वारा सुटला की याचे ढग तयार होऊन तो पसरतो. या ग्रहांचे पृष्ठभाग पूर्णपणे सपाट आहेत त्यामुळे येथे वारे अगदी सुस्साट म्हणजे सुपरसॉनिक वेगाने (1500 मैल/तास वेगाने) वाहतात. येथील वातावरणात घनरुप कार्बनचे प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे येथे हिऱ्यांचा पाऊस पडतो. पण हे हिरे कुणालाही मिळू शकत नाही. कारण हा ग्रह पृथ्वीपासून फार दूर आहे. तेथील वातावरणही अतिशय थंड आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Cat Temple : भारतातील 'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा, 1000 वर्ष जुनी परंपरा; कारण माहितीय?