World's Most Beautiful Queen Cleopatra : इतिहासातील अनेक रहस्यमय कहाण्या ऐकायला मिळतात. इतिहासाच्या पानांमध्ये अनेक गूढ तर काही विचित्र रहस्यमय कहाण्याही पाहायला मिळतात. त्यातील एक रहस्यमय कहाणी म्हणजे राणी क्लियोपात्राची. जगातील सर्वात सुंदर राणीचा उल्लेख झाल्यास पहिलं नाव घेतलं जात ते म्हणजे राणी क्लियोपात्रा (Queen Cleopatra). राणी क्लियोपात्राचं आयुष्य आणि तिचा मृत्यू याबाबत रहस्य आजही कायम आहे. इजिप्तवर (Egypt) राज्य केलेल्या राणीची कब्र आजतागायत सापडलेली नाही. अद्यापही अनेक संशोधक या शोधात आहेत.


गातील सर्वात सुंदर राणी क्लिओपात्रा


राणी क्लियोपात्रा बाबत इतरही अनेक रहस्य आहेत. इजिप्तची राणी क्लियोपात्रा हिची गणना जगाच्या इतिहासातली सर्वात सुंदर राण्यांमध्ये केलं जातं. इजिप्तच्या अनेक साहित्यामध्ये तिच्या सुंदरतेचं वर्णन आढळतं. राणी क्लियोपात्राने 51 ईसापूर्व पासून 30 पूर्व या काळात तिने प्राचीन मिस्त्र म्हणजेच इजिप्तवर राज्य केलं. सुमारे 21 वर्ष राणी क्लियोपात्राने इजिप्तवर राज्य केलं. 


18 वर्षांची असताना वडीलांचं निधन


राणी क्लियोपात्रा 18 वर्षांची असताना तिच्या वडीलांचं निधन झालं. त्यानंतर तिने तिच्या दोन भावांसोबत लग्न केलं. वडीलांच्या निधनानंतर क्लियोपात्राने प्राचीन प्रथेनुसार, तिच्या दोन भावांसोबत मिळून राज्य कारभार केला. राणी क्लियोपात्रा तिच्या सुंदरतेप्रमाणेच आर्थिक रणनितींसाठी ओळखली जायची. राणी क्लियोपात्राच्या काळात प्राचीन इजिप्तची अर्थव्यवस्था आजच्या तुलनेहूनही अधिक बळकट होती, असं म्हटलं जातं. 


सुंदर दिसण्याचं रहस्य


इजिप्शियन राणी क्लियोपात्राबद्दल असं म्हटलं जातं की, त्या काळात संपूर्ण जगात तिच्यापेक्षा सुंदर कुणीही नव्हतं. इतिहासकारांनी तिच्या सौंदर्याबद्दल लिहिताना नोंद केलं आहे की, सुंदर दिसण्यासाठी दररोज गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची. प्लिनी द एल्डरने त्याच्या नॅचरल हिस्ट्री या पुस्तकात राणी क्लियोपेट्राबद्दल लिहिलं आहे की, ती दररोज गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची आणि या दुधात शेकडो गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जायच्या. यासोबतच राणी क्लियोपात्रा तिच्या अंगावर जो परफ्यूम वापरत असे, तो तयार व्हायला अनेक महिने लागत असतं.


भावांसोबत लग्न


राणी क्लियोपात्रा बद्दलच्या एका प्रचलित कथेनुसार असं सांगितलं जातं की, तिने तिचा सख्खा भाऊ टॉलेमीशी लग्न केलं. क्लियोपात्राच्या वयाच्या 18 व्या वर्षी तिच्या वडीलांचं निधन झालं. त्यानंतर राणी क्लियोपात्राने इजिप्तच्या सिंहासनावर बसण्यासाठी तिच्या दोन भावांसोबत लग्न केलं. नंतर ज्युलियस सीझरच्या मदतीने राणी क्लियोपात्राने तिच्या दोन्ही भावांची हत्या करून सत्तेचा मार्ग मोकळा केला आणि स्वतः इजिप्तच्या सिंहासनावर बसली. म्हणूनच राणी क्लियोपात्रा सुंदरतेप्रमाणेच एक क्रूर राणी म्हणूनही ओळखली जाते. 


राणी क्लिओपात्राचा मृत्यू कसा झाला?


राणी क्लियोपात्राच्या आयुष्याप्रमाणेच तिचा मृत्यूही रहस्यमय होता. राणी क्लिओपात्राच्या मृत्यूवरून आजपर्यंत वाद कायम आहेत. काही इतिहासकार म्हणतात की, राणी क्लियोपात्राची हत्या झाली होती. तर, काहींच्या मते, रात्री क्लियोपात्राने आधी मार्क अँटोनीचा खून केला आणि नंतर स्वत: ला आत्महत्या केली. राणी क्लियोपात्राचं गूढ आजही कायम आहे. तिची कब्रही अद्याप सापडलेली नाही.


संबंधित इतर बातम्या :


Queen Elezabeth : सुंदर दिसण्यासाठी तरुणींच्या रक्ताने अंघोळ, सीरियल किलर महाराणीची कहाणी, वाचा सविस्तर...