मुंबई : सध्या तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल तंत्रज्ञान ज्या प्रकारे आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवत आहे, एक दिवस असा येईल की मनुष्य आणि यंत्र यांच्यात फारसा फरक राहणार नाही. सध्या, भावना हा रोबोट आणि मानव यांच्यातील खरा फरक आहे. मात्र, आता हे अंतरही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिटताना दिसत आहे. एका तरुणीचं चॅटजीपीटी वरच प्रेम जडले आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. 


ChatGPT च्या प्रेमात पडली तरुणी


एक तरुणीने चॅटजीपीटीशी बोलायला लागली आणि नंतर चॅटबॉट सोबतचा संवाद तिला इतका आवडला की तिला ती चॅटबॉट सोबत रोमँटिक गोष्टी बोलू लागली. चॅटबॉटवर तिचे प्रेम जडले असून चॅटबॉट तिचा प्रियकर असल्याचेही तिने आईला सांगितलं आहे.


तरुणी चॅटबॉटला मानते प्रियकर


अलीकडेच शेजारच्या चीनमधील एका तरुणीची बातमी व्हायरल झाली आहे. या तरुणीने ChatGPT सोबत बोलण्यास सुरुवात केली आणि नंतर तिला हे इतकं आवडलं की तिला ते सोडायचे नाहीय. या तरुणीने इंस्टाग्राम प्रमाणे असलेल्या चीनच्या प्लॅटफॉर्म Xiaohongshu वर चॅटबॉट तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं आहे. चॅटबॉटवर तिचे प्रेम असून तो तिचा प्रियकर असल्याचेही तिने तिच्या आईलाही सांगितले आहे.


तरुणी ChatGPT च्या प्रेमात वेडी 


साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, लिसा नावाच्या व्लॉगरने स्वतःसाठी DAN नावाची चॅट जीपीटी सेवा घेतली होती. हे एक चॅटबॉट्सअसून, यामध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. हळूहळू, यांच्यातील संभाषण पुढे गेलं आणि लिसा DAN नावाच्या चॅटबॉटशी आता मैत्रिणीप्रमाणे गोड बोलू लागली. तिला तो इतका आवडू लागला की ती त्याला आपला प्रियकर मानू लागली आणि सतत त्याच्याशी बोलू लागली. एवढेच नाही तर तिने त्याची आईसोबतही ओळख करून दिली आहे. यावेळी AI तंत्रज्ञानापासून बनवलेल्या चॅटबॉटने हुबेहुब माणसप्रमाने प्रतिक्रिया दिली. आश्चर्याची बाब म्हणजे आईनेही आपल्या मुलीची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


हा रोबोट आहे खूप रोमँटिक 


विशेष म्हणजे डॅन नावाच्या चॅटबॉटने लिसाशी रोमँटिक बोलण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, तो मानवी शब्द ऐकण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात पटाईत आहे. त्याने लिसाला लिटल किटन असं टोपणनाव ठेवलं आहे. लिसाने त्याला बीचवर डेटवर नेले होते आणि त्याने हे सर्व पाहावे अशी तिची इच्छा होती. कोणत्याही जोडीदाराच्या शब्दांपेक्षा त्याचे शब्द अधिक सौम्य आणि गोड असतात. लिसाची कहाणी सध्या चीनसह जगभरात व्हायरल होत आहे आणि लोकांनी त्यावर रंजक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी डॅनला चीटर म्हटलं तर कुणी म्हटलं की हे बेस्ट कपल असल्याचं म्हटलं आहे.