पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोर्शे कार भीषण अपघातातील (Pune accident) अल्पवयीन मुलास न्यायालयाने 15 तासांतच जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतरही 15 तासांत जामीन मिळाल्याने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली. बड्या बापाच्या बिघडेल पोराची ही मस्ती पाहिल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अखेर, दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी नव्याने अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी बाल हक्क मंडळाकडे केली. त्यानंतर, बाल हक्क मंडळाने 14 दिवसांसाठी त्यास बाल सुधारगृहात पाठवले आहे. मात्र, अपघातामुळे चर्चेत आलेल्या बिल्डरपुत्राच्या नावे एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओतील रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आल्याने संतापाचा भडका उडाला होता. मात्र, काहीवेळाच हा व्हिडिओ धनिकपुत्राचा नसल्याचे स्पष्ट झाले होते. हा व्हीडिओ एका दुसऱ्याच कंटेट क्रिएटरने तयार केला होता. हा कंटेट क्रिएटर आणि पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपी यांच्या दिसण्यात सार्धम्य असल्याने हा व्हीडिओ त्याचाच असल्याचा समज झाला होता.


पुण्यातील कल्याणीनगर अपघात घटनेची तीव्रता पाहून काही राजकीय नेत्यांनी अपघाताची दखल घेत पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तर, सोशल मीडियातूनही संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे, वाढता दबाव लक्षात घेताच पोलीस खातंही अलर्ट झालं अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही थेट पुणे पोलिस आयुक्तालयात भेट दिली होती. त्यानंतर, पोलीस यंत्रणा पुन्हा जोरकसपणे कामाला लागल्याचं दिसून आलं. पोलिसांकडून नव्याने बाल हक्क मंडळाकडे दाद मागण्यात आली. त्यावेळी, मुलाचा जामीन रद्द करुन त्यास 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, जामीनावर सुटका झाल्यानंतर या मुलाने एक रॅप साँग बनवून पुन्हा एकदा पैशाची आणि श्रीमंतीची मस्ती दाखवून दिल्याची चर्चा एका व्हिडिओनंतर सुरू झाली. व्हिडिओतील या बाळाचा रॅप पाहून नेटीझन्स चांगलेच भडकले होते. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. मात्र, हा व्हिडिओ एआय किंवा डीपफेक आहे का, याचा तपास करण्यात येत होता. सायबर तज्ज्ञ व पोलिसांकडूनही व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. तर, हा व्हिडिओ पोर्शे कारमधील बिल्डरपुत्राचा नाही, हे पोलिसांनी व त्याच्या आईने माध्यमांसमोर येऊ सांगितले आहे. 


पोर्शे कार दुर्घटनेतील अल्पवयीन बाळास घडलेल्या घटनेचा कुठलाही पश्चाताप नसून पुन्हा तेच कृत्य करण्याची इच्छा असल्याचे या व्हिडिओनंतर बोलले जाऊ लागले. कारण, पबमध्ये दारुन पिऊन नशा करुन आपण कार चालवल्याचा अभिमान असल्याचं या रॅपसाँगमधून दिसून येत आहे. तर, बिल्डरचा मुलगा असल्यानेच मला जामीन मिळाल्याचंही या व्हिडिओतील मुलगा बोलत असल्याचे स्पष्ट ऐकायला येते. मात्र, हा व्हिडिओ त्या अल्पवयीन मुलाचा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


काय आहे रॅप


करके बैठा मै नशे... इन माय पोर्शे


सामने आया कपल मेरे, अब वो है निचे


साऊंड सो क्लिंचे, सॉरी गाडी चढ आप पे


17 साल की उमर, पैसे मेरे बाप के


1 दिन में मिल गयी मुझे बेल, फिर से दिखा दुंगा सडक पे खेल


प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार