मुंबई : रेल्वेचा (Train) प्रवास सर्वात परवडणारा प्रवास मानला जातो. स्वस्त दरात फिरायचं असेल तर, ट्रेनचा प्रवास (Indian Railway) हा बेस्ट पर्याय आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा काही लोक स्वत:च तिकीट घेणं विसरतात. तिकीट नसणाऱ्यांना टीसी पकडताना तुम्ही अनेक वेळा पाहिलंही असेल. तर काही जण फुकटात प्रवास करण्यासाठीही तिकीट घेणं टाळातात आणि पकडले जातात. टीसी आणि एका महिलेचा याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण, याचं कारण काहीसं वेगळं आहे. एका महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करणारा हा व्हिडीओ आहे. 


साध्या-भोळ्या माऊलीचा प्रामाणिकपणा 


सध्या जिथे सध्या बहुतेक जण फुकट ते पौष्टिक समजतात. पण, एका साध्या-भोळ्या माऊलीचा प्रामाणिकपणा पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या बकरीसोबत ट्रेनने प्रवास करताना दिसत आहे. यावेळी तिकीट चेकर तिथे येतो. या दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.


बकरीसह प्रवास करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल 


ही महिला तिच्या बकरीसह ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी तिथे टीसी येतो आणि महिलेला तिकीट विचारतो. यानंतर जे घडलं ते पाहून टीसीही अवाक होतो. याचं कारण म्हणजे या महिलेने स्वत:चं तिकीट काढण्यासोबतच बकरीचंही तिकीट काढलं. या माऊलीच्या प्रामाणिक पाहून टीसीही खुश झाला. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या महिलेच्या प्रामाणिकपणाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


महिलेनं काढलं बकरीचंही तिकीट


हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, एक महिला तिच्या बकरीसह ट्रेनमध्ये उभी आहे आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती ट्रेनने प्रवास करता आहे. यावेळी टीसी या महिलेजवळ येतो आणि तिकीट विचारतो. त्यानंतर टीसी महिलेला बकरीच्या तिकीटाबाबत विचारतो. यावेळी महिला सांगते की, हो आम्ही आमच्यासोबत आमच्या बकरीचंही तिकीट काढलं आहे. महिलेसोबत असलेला व्यक्ती टीसीला तीन तिकीटे दाखवतो.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






नेटकऱ्यांकडून महिलेचं कौतुक


महिलेचा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या या व्हिडीओचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे. अनेक लोक या माऊलीचं कौतुक करत आहे. एका युजरने लिहिलं आहे की, 'हा व्हिडीओ पाहून माझा दिवस चांगला जाईल'. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'जिथे स्वत:ला सुशिक्षित समजणारे लोक फुकट प्रवास करतात, पण या महिलेच्या प्रामाणिकपणाला सलाम... तिने बकरीचंही तिकीट काढलं.'