GK: असं बऱ्याचदा घडतं की, आपण एखाद्या ठिकाणी जात असताना आपल्याला रस्त्यावर पैसे (Money) पडलेले दिसतात. बरेच जण आजूबाजूला पाहतात आणि कोणी बघत नसेल तर ते पैसे उचलून स्वत:च्या खिशात टाकतात. एखादी मौल्यवान वस्तू जरी रस्त्यावर पडलेली आढळली तर अनेकजण त्या वस्तूबद्दल आजूबाजूला कोणालाही विचारतात आणि कोणी मालक सापडला नाही की, ती वस्तू स्वत:कडे ठेवतात. पण असं करणं कितपत योग्य आहे आणि किती चुकीचं याचा विचार तुम्ही कधी केला का? कायद्यानुसार, असं केल्यास तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
असं म्हटलं जातं की, जर एखाद्या व्यक्तीला 10 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची वस्तू वाटेत सापडली तर ती वस्तू पोलिसांना किंवा त्याच्या मालकाला परत करणं आवश्यक आहे, अन्यथा कारवाई केली जाऊ शकते. पण रस्त्यावर सापडलेल्या वस्तूंबाबत काय नियम आहेत? कायदा काय सांगतो? रस्त्यावर सापडलेले पैसे किंवा वस्तू उचलल्याने काही कारवाई होते का? याच्या तर्क-वितर्कांकडे लक्ष न देता कायदेतज्ज्ञ काय सांगतात ते पाहूयात...
कायदा नक्की काय सांगतो?
दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील प्रेम जोशी यांच्या म्हणण्यानुसार, भारतात एक कायदा आहे जो कॉन्ट्रॅक्ट लॉ 1872 म्हणून ओळखला जातो. या कायद्यातील कलम 71 एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या वस्तूंशी संबंधित कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबद्दल आहे.
या कायद्यात असं म्हटलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला एखाद्याचं सामान सापडलं तर ते स्वत:कडे नीट ठेवावं, जबाबदारीने हाताळावं, त्याला हानी न पोहोचवता आहे त्या स्थितीत ठेवावं. सापडलेली वस्तू त्याच्या मूळ मालकाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही पोलीस आणि आयकर एजन्सींची मदत घेऊ शकतात.
सापडलेल्या वस्तूंचा गैरवापर केल्यास तुरुंगवास
वकील जोशी असंही म्हणतात की, असा कोणताही विशिष्ट कायदा नाही ज्यात तुम्हाला रस्त्यावर सापडलेल्या वस्तूची सक्तीने पोलीस तक्रार करावी लागेल. जर एखाद्याला कोणती वस्तू रस्त्यावर पडलेली सापडली आणि त्याने ती स्वत:कडे ठेवली तर ती चोरी समजली जात नाही, पण ज्या व्यक्तीला ती वस्तू मिळाली तो तिचा गैरवापर करू शकतो. अशा वेळी, भारतीय दंड संहितेच्या कलम 403 नुसार, चुकीच्या पद्धतीने सापडलेल्या वस्तूंचा वापर करणं हा गुन्हा ठरू शकतो. असं केल्यास या प्रकरणी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि तुमच्याकडून दंड देखील आकारला जाऊ शकतो.
कायद्यात कडक तरतूद नसली तरी रस्त्यावर सापडलेली वस्तू त्याच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Largest District : भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? एकेकाळी राज्य होता 'हा' जिल्हा!