Train Woman Viral Video : भारतात रेल्वेचं मोठं जाळ पसरलेलं आहे. दिवसभरात लाखो लोक रेल्वेने (Railway) प्रवास करतात. अनेक वेळा रेल्वे अपघाताच्या बातम्याही समोर येतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांमध्ये रेल्वे प्रवासाबाबत जागरुकता पसरवण्याचं काम सुरु आहे. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे स्थानकांवर सातत्याने मार्गदर्शक सूचनाही दिल्या जातात. मात्र, काही लोक आपला जीव धोक्यात घालून जीवघेण्या पद्धतीने प्रवास करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या चिमुकल्या बाळासह अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे.
बाळाला कडेवर घेत आईचा जीवघेणा प्रवास
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून अक्षरक्ष: तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. रेल्वेच्या टपावर प्रवासाचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. पण, दोन रेल्वे डब्ब्यांच्या मध्ये बसून कोणी प्रवास करू शकेल अशी कल्पना तुम्ही करू शकता का? या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रेनच्या दोन बोगींमधील जॉईंटवर बसून प्रवास करत असल्याचं दिसत आहे.
ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉईंटवर बसून प्रवास
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिलेचा जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला कडेवर चिमुकल्याला घेऊन ट्रेनच्या दोन बोगींच्या जॉईंटच्या साखळीवर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसत आहे. एका बाजूला रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन केलं जात असताना, दुसरीकडे धोकादायक पद्धतीने प्रवासाचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
ट्रेनच्या जॉईंटवर बसून धोकादायक प्रवास
ही महिला काही महिन्यांच्या चिमुकल्यासह ट्रेनच्या जॉईंटवर बसली आहे. तिने एका हातात चिमुकल्याला पकडलं असून दुसऱ्या हाताने ट्रेनचं हँडल पकडलं आहे. ही ट्रेन अतिशय वेगाने धावत आहे. ही महिला कोणत्याही क्षणी खाली पडू शकते, असं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. जर या महिलेचा हात सुटला तर, ही महिला आणि चिमुकला ट्रेनखाली येईल, असं दिसत आहे.