Kalawanti Durg, Prabalgad Fort : सह्याद्री पर्वतरांगामध्ये आजही ताठ मानेनं उभा असलेला प्रबळगड (Prabalgad Fort), देशातील सर्वात धोकादायक किल्ला (India's Most Dangerous Fort) म्हणून ओळखला जातो. प्रबळगड चढणे सर्वात धोकादायक असून जिकरीचं काम मानलं जातं. हा गड चढण्यासाठी अतिशय कठीण आणि धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या रायगडमधील हा किल्ला ट्रेकर्सचं खास आकर्षण आहे. मान्सूनमध्ये या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. सह्याद्री पर्वतरांगामध्ये माथेरान आणि पनवेलच्या मधे असलेला हा प्रबळगड म्हणजे कलावंतीण दुर्ग (Kalawantin Fort).
भारतातील सर्वात धोकादायक किल्ला
प्रबळगड उर्फ कलावंतीण दुर्ग 2300 फूट उंचीवर आहे. एका सरळ डोंगरावर दगड फोडून वाट काढत हा गड बनवण्यात आला आहे. या किल्ल्यावर जायचा रस्ता अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात धोकादायक किल्ला मानला जातो. खडक फोडून पायऱ्या तयार करत हा गड बांधण्यात आला आहे. या दगडी पायऱ्यांवर दोऱ्या किंवा रेलिंग नाही. त्यामुळे हा सरळ किल्ला चढणं फार कठीण आहे, वाटेतील एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. वाटेतील एक चूक किंवा पाय घसरल्यास खाली थेट खोल दरी आहे. या किल्ल्यावरून पडून अनेकांचा मृत्यूही झाला आहे.
मुरंजन गड उर्फ कलावंतीण दुर्ग
प्रबळगड अर्थात कलावंतीण दुर्गाला इतिहासात खास स्थान आहे. मुरंजन गड असं या किल्ल्याचं सुरुवातीचं नाव यादवांनी त्याकाळी गडाला हे नाव दिलं होतं. प्रबळगड व्यापारी मार्गावर आणि समुद्री मार्गाजवळ असल्यामुळे येथे यादव काळात लष्करी तळ उभारण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव कलावंतीण दुर्ग असं ठेवलं. प्रबळगड आधी प्रहरीदुर्ग या नावाने ही ओळखला जात होता.
2300 फूट उंचीवर किल्ला
प्रबळगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. पश्चिम घाटातील हा एक भव्य किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर आहे. येथून इर्शालगड किल्ला आणि कल्याण किल्ल्याचे विहंगम दृश्य पाहता येते. 2300 फूट उंच टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याला फार कमी लोक येथे जाण्याचं साहस करतात आणि जे या किल्ल्यावर येतात ते सूर्यास्तापूर्वी गड उतरतात. उभी चढाई असल्यामुळे माणूस येथे जास्त काळ राहू शकत नाही. किल्ल्यावर वीज आणि पाण्याची व्यवस्थाही नाही. संध्याकाळ होताच भयान मैल शांतता पसरते.