Viral Video : फिरायला कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला जगभरात फिरायला आवडतं. प्रत्येक ठिकाणाचं एक वैशिष्ट्य असतं. नैसर्गिक, ऐतिहासिक सौंदर्यासह खाद्यसंस्कृतीमुळे बरीच ठिकाणं प्रसिद्ध असतात. मुंबई, दिल्लीसारख्या जगभरातील अनेक शहरांत विविध प्रकारचे स्ट्रीट फूड आढळतात. हे स्ट्रीट फूड (Street Food) खवय्यांच्या पसंतीस उतरतात. अनेकजण आवर्जून त्या त्या ठिकाणचं स्ट्रीट फूड खातात आणि त्याची चवही चाखतात. त्यांच्या जीभेवर ही चव कायमच राहते. पण काही ठिकाणी मिळणारे स्ट्रीट फूड पाहून अथवा ऐकून तुम्ही चकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगात सर्वात आश्चर्यकारक स्ट्रीट फूड चीन (China) आणि थायलंडमध्ये (Thailand) पाहायला मिळतं, असे नेटकरी म्हणतात. सध्या येथीलच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला काळ्या रंगाचे नूडल्स विकत असल्याचं दिसत आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्या महिलेला ट्रोल केलंय.
थायलंड ते व्हिएतनाम आणि चीनमध्ये मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये सर्वात जास्त नॉनव्हेजचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये अगदी झुरळांपासून रेशीम किडे आणि विंचूंपर्यंत अनेक कीटक खायला दिले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क काळ्या रंगाचे नूडल्स बनवताना दिसतेय. या नूडल्सने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
पाहा व्हिडीओ :
तुम्ही कधी पाहिलेत का काळ्या रंगाचे नूडल्स?
सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला नूडल्स बनवताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, हे थायलंडचं स्ट्रीट फूड आहे. पण, काळ्या रंगाचेही नूडल्स असू शकतात ? या विचाराने खाद्यप्रेमींचा गोंधळ उडाला आहे. या व्हिडीओच्या खाली कमेंट्समध्ये अनेक यूजर्सने प्रश्न विचारला आहे.
व्हिडीओला 6 मिलियनहून जास्त व्ह्यूज
सोशल मीडियावर Our Collection या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हिडीओला 6.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक लाख 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून यूजर्स अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत. तर, अनेकांनी त्या महिलेची खिल्लीही उडवली आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'हे तर पावसात दिसणारे गांडूळ वाटतय.' तर, दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, याच कारणामुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला.' तर, काहींनी 'ही मला सापाची छोटी पिल्लं वाटतायत' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :