Big Daddy Crab Guinness World Record : जगात अनेक प्रकारचे प्राणी राहतात. प्रत्येक प्राण्याची स्वतःची वेगळी ओळख असते. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे प्राणी पाहिले असतील. पण तुम्ही कधी सर्वात मोठा खेकडा पाहिला आहे का, नसेल तर आज आम्ही तुम्हाला असा खेकडा (Crab) दाखवणार आहोत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका खेकड्याचे फोटो शेअर केले आहेत. या खेकड्याचे पाय 10 फूट लांब असून या खेकड्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness World Record) नोंदवले गेलं आहे.
जगातील सर्वात मोठा खेकडा
सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मोठ्या आकाराचा खेकडा दिसत आहे. या खेकड्याचं नाव 'बिग डॅडी' (Big Daddy) असं आहे. हा खेकडा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. या खेकड्याने अनेक विक्रम मोडले आहेत. या खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांब आहेत. यामुळेच खेकड्याचं नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बिग डॅडी खेकड्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
पाहा : जगातील सर्वात मोठा खेकडा
खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांब
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने 'बिग डॅडी' (Big Daddy) खेकड्याचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'बिग डॅडी' खेकडा. हा जपानी स्पायडर खेकडा आहे, जो ब्रिटनमधील सी लाईफ ब्लॅकपूल (Sea Life in Blackpool, UK) येथे राहतो. बिग डॅडी खेकड्याचे पाय 3.11 मीटर (10 फूट 2.5 इंच) लांब आहेत. या खेकड्याच्या नावावर जगातील सर्वात लांब खेकडा असल्याचा विक्रम असून त्याच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.
बिग डॅडी खेकडा सध्या चर्चेत
सध्या बिग डॅडी' नावाचा खेकडा चर्चेत आहे. या खेकड्याचे पाय 10 फुटांपेक्षा जास्त लांबीचे आहेत, त्यामुळे हा खेकडा चर्चेत आला आहे. बिग डॅडी खेकड्याच्या पायाच्या लांबीमुळे त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. या खेकड्याचे फोटो अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईल या खेकड्याचा आकार केवढा मोठा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :