Lottery Winner : 'भगवान देता है तो छप्पर फाड के' ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. कुणाचं नशीब (Luck) कधी पालटेल काही सांगता येत नाही. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. बँकेबाहेर भीक मागणाऱ्या एक महिला कोट्यधीश झाली आहे. या महिलेला तब्बल 10 कोटींची लॉटरी लागली आहे. स्पेन (Spain) मधील एका महिलेचं नशीब चांगलंच फळफळलं. बँक बाहेर भीक मागणाऱ्या महिलेली 10 कोटींची बंपर लॉटरी लागली आहे. या महिलेनं एका तंबाखूच्या दुकानातून लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) खरेदी केलं होतं. ती नेहमी लॉटरीचं तिकीट खरेदी करायची, मात्र यावेळी या महिलेनं नशीब काढलं आणि 10 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. 


स्पेनमधील या महिलेनं गेल्या आठवड्यात तंबाखूच्या दुकानातून नेहमीप्रमाणे बोनोलोटो लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. मात्र हे लॉटरीचं तिकीट तिचं नशीब पालटवणारं ठरलं. या लॉटरीच्या तिकीटावर महिलेला 1,271,491 युरो एवढी म्हणजेच 10 कोटी 68 लाख 30 हजार 674 रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर महिला फार खुश झाली. तिनं लॉटरीच्या दुकानात जाऊन दुकान मालकाला धन्यवाद देत म्हटलं की, तुम्ही माझ्या आयुष्यातील दु:ख दूर केली आहेत.


महिलेनं जिंकली 10 कोटींची लॉटरी


दरम्यान, लॉटरी जिंकणाऱ्या या महिलेची ओळख अद्याप उघड झालेली नाही. मात्र, दुकानाच्या मालकाचं म्हणणं आहे की, त्या महिलेची आर्थिक परिस्थिती फार वाईट होती, त्यामुळे ती भीक मागायची. दुकानदारानं पुढे सांगितलं की, 'महिला लॉटरी जिंकल्यावर माझ्याकडे आली आणि माझे आभार मानू लागली. माझ्या आयुष्याचा प्रश्न सोडवलास अशी भावना महिलेनं दुकानदाराकडे व्यक्त केली. यापेक्षा कोणतीही चांगली गोष्ट कोणती असू शकतं नाही, असंही ती म्हणाली.'


महिला नेहमी लॉटरीचं तिकीट खरेदी करायची


एका दिवसात कोट्यधीश झालेल्या महिलेची आर्थिक परिस्थिती वाईट होती. तिला पैशाची चणचण होती, त्यामुळे ती भीक मागून उदरनिर्वाह करायची. पण लॉटरी लागण्याच्या आशेनं ती नेहमी लॉटरीचं तिकीट खरेदी करायची. दुकान मालकानं सांगितलं की, ही महिला दररोज सकाळी 9 ते दुपारी 8 या वेळेत बँकेसमोर भीक मागायची. काही पैसे गोळा झाल्यानंतर ती दुकानात यायची आणि लॉटरीची तिकिटं खरेदी करायची. यामध्ये प्रामुख्याने बोनोलोटो आणि प्रिमिटिव्हा लॉटरीच्या तिकीटांचा समावेश होता.