Tears Fact : आपण कधी खूप आनंदी किंवा खूप दु:खी असून तर आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रडताना डोळ्यातून अश्रू येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. कधी-कधी आपण रडत नसलो तर अचानक आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. पण डोळ्यातून पाणी येण्यामागचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? डोळ्यातून पाणी येण्याचा आपल्या मनातील भावनांसोबत काय संबंध आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज या बातमीमध्ये या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या...


अश्रूंचे अनेक प्रकार आहेत


अश्रूंचे अनेक प्रकार आहेत. काही अश्रू ऍलर्जी, संसर्ग किंवा इतर समस्येमुळे येतात. या संक्रमणामुळे येणाऱ्या अश्रूंना वॉटरी आयज असं म्हणतात. डोळ्यांसंबंधित समस्येमुळे डोळ्यातून पाणी येतं त्याला वॉटरी आयज म्हणतात. याशिवाय अनेकवेळा जोरदार वाऱ्यामुळेही डोळ्यातून अश्रू येतात, तर काही अश्रू येण्याचं कारण रडण्याशी संबंधित असते. याविषयी जाणून घ्या.


रडल्यावर अश्रू का येतात?


डोळ्याच्या कडे छोटीस छिद्रे असतात. डोळ्यातील ग्रंथी डोळ्यातील ओलसरपणा टिकवण्यासाठी द्रव पदार्थ तयार करत असतात. यामुळे डोळ्याच्या कडा कायम पाणावलेल्या असतात. हा ओलावा पापण्यांच्या हालचालींमुळे डोळ्यांच्या समोरील पृष्ठभागावर पसरवला जातो आणि त्यामुळे डोळ्यात आवश्यक असलेला ओलसरपणा कायम राहतो. डोळ्याची कार्य सुरळीत ठेवण्यासाठी डोळ्यातील ओलावा, डोळ्यांचं निर्जंतुकीकरण गरजेचं असतं. तसेच डोळ्यात गेलेला कचरा, घाण, धूळ बाहेर काढण्यासाठीही अश्रूंचा उपयोग होतो. त्याचबरोबर डोळ्यात झालेली जखम बरी होण्यासाठी या द्रवाचा उपयोग होतो. 


जेव्हा आपण भावनिक होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते. म्हणजे खूप दु:ख किंवा खूप आनंदी अशा कोणत्याही भावनेच्या टोकाला असते तेव्हा शरीरात अनेक प्रतिक्रिया होतात. यामुळे, शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात, ज्यामध्ये एड्रेनालाईन हार्मोनची पातळी बदलचे याचा थेट संबंध डोळ्यांशी असतो. त्यामुळे या हार्मोन्समधील बदलाचा डोळ्यांवर परिणाम होतो. अशा स्थितीत डोळ्यांत डोळ्यातून पाणी म्हणजेच अश्रू येऊ लागतात.


रडणं आरोग्यासाठी चांगलं


आपण अनेक वेळा भावूक होऊन रडचो. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा शरीरावर परिणाम होतो आणि अतिशय भावनिक झाल्यावर अश्रू वाहतात. कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला की बहुतेक व्यक्तींना रडू कोसळतं. रडणं तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. रडण्यामुळे तुमच्या मनातील भावना मोकळ्या होतात. यामुळे केवळ डोळेच नाही तर मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.